Gold Silver Rates: सोने-चांदी पुन्हा महागले, हे आहेत नवे दर
इंधन दरवाढी बरोबर आता सोन्या चांदीचे दरही वाढू लागले आहेत.
X
गेल्या एका महिन्यात सोन्याच्या किमतीत कमालीची घसरण झाली आहे. मात्र, आज सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ९.१० वाजता २४ कॅरेट शुद्धतेची फ्युचर्स किंमत ५०,९९० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली होती, जी बातमी लिहिपर्यंत ५०,९४७ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. यापूर्वी सततच्या घसरणीमुळे सोन्याचे भाव महिन्याभराच्या नीचांकी पातळीवर पोहोचले होते. आज सकाळी MCX वर सोन्याच्या दरात ०.२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, आता सोन्याच्या दरात फारशी वाढ झालेली नाही.
चांदीच्या भावात वाढ
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. बुधवारी एमसीएक्सवर चांदीच्या फ्युचर्समध्ये ०.२३ टक्क्यांहून अधिक उसळी दिसून आली, त्यामुळे चांदीचा दर पुन्हा एकदा ६७ हजारांच्या पुढे गेला. वृत्त लिहेपर्यंत चांदीचा भाव ६७,१०२ रुपये प्रति किलो या पातळीवर आहे. याआधी सततच्या घसरणीमुळे चांदीचे दर ६७ हजारांच्या खाली पोहोचले होते.
जागतिक बाजारात तेजी आहे
भारतीय वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण होत असली तरी जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे. सोन्याची स्पॉट किंमत 0.28 टक्क्यांनी वाढून $1,920.6 प्रति औंस झाली.
तज्ञ काय म्हणतात?
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध संपल्यानंतर सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होऊ शकते. वास्तविक, रशियाकडेही सोन्याचा मोठा साठा असून ते जागतिक बाजारपेठेत विकण्याची तयारी सुरू आहे. सोन्याचा हा साठा बाजारात आल्यास त्याचा बाजारातील पुरवठा वाढेल आणि भावात मोठी घसरण होऊ शकते. पण हे कधी शक्य होईल याची चिन्हे नाहीत






