Latest News
Home > News > दिवाळीत फिरायला जाणार असाल तर खिशाला चांगलीच कात्री बसेल....

दिवाळीत फिरायला जाणार असाल तर खिशाला चांगलीच कात्री बसेल....

दिवाळीत फिरायला जाणार असाल तर खिशाला चांगलीच कात्री बसेल....
X

मागील दीड वर्षापासून देशभर कोरोना महामारीने थैमान घातले आहे. या दीड वर्षाच्या काळामध्ये कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून देशभर लॉकडाउन करण्यात आले होते. आता मात्र परिस्थितीत बदल होत आहे. परिस्थिती हळूहळू निवळताना दिसत आहे. लसीकरणाची मोहीम सुद्धा देशभर मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. अनेकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात आता रुग्ण संख्या घटत आहे. त्यामुळे दीड वर्षांपासून घरात असलेले अनेक लोक सध्या दिवाळीमध्ये फिरायला जाण्याचं नियोजन करतायत. मात्र या वेळी फिरायला जाताना तुम्हाला तुमचा खीसा चांगला मोकळा करावा लागणार आहे. कारण राज्यातील खाजगी बस ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तिकीट दरात 30 टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 30 तारखेपासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. त्यात सध्याचे जर पेट्रोलचे दर पाहिले तर ते 100 रुपयांच्या पार पोहोचले आहेत.

आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येतीये. त्यामुळे पर्यटन ठिकाणी सुद्धा लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. पुढच्या महिन्यात दिवाळी आहे. त्यामुळे अनेकांनी असा प्लॅन केला असेल की, 4 ऑक्टोंबरला लक्ष्मीपूजन झालं की शुक्रवारपासून पर्यटनासाठी बाहेर पडायचं. त्यामुळे अनेकजण आत्ताच ट्रॅव्हल्सचे बुकिंग करण्याचा प्रयत्न करत असतील. मात्र तुम्हाला अनेक ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून 'अजून बुकिंग सुरू झालं नाही' असं सांगितलं जात असेल. याचं कारण हेच आहे कारण की, येत्या 30 तारखेपासून खाजगी ट्रॅव्हल्सच्या दरामध्ये 30 टक्क्यांनी वाढ केली जाणार आहे. त्यामुळे अनेक जण सध्या बुकिंग सुरू नाही असं सांगतायत.

तुम्ही म्हणाल की, मग आम्ही खाजगी वाहनाने जाऊ. तरीसुद्धा तुम्हाला तुमचा खिसा हलका करावाच लागणार आहे कारण आता पेट्रोल व डिझेलचे भाव शंभर रुपयांच्या पार पोहोचले आहेत. त्याचबरोबर अनेक पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणावर लोक येत असल्यामुळे अनेक ठिकाणी रेस्टॉरंटचे सुद्धा दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे फिरायला जात असाल तर खिसा मोकळा करण्याची तयारी सुद्धा ठेवा म्हणजे झालं.

Updated : 2021-10-23T16:06:50+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top