Home > News > न्युड व्हिडीओ भोवला : पुनम पांडेला गोवा पोलीसांनी केलं अटक

न्युड व्हिडीओ भोवला : पुनम पांडेला गोवा पोलीसांनी केलं अटक

न्युड व्हिडीओ भोवला : पुनम पांडेला गोवा पोलीसांनी केलं अटक
X

गोव्यातील धरणावर आक्षेपार्ह चित्रीकरण केल्याने अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडेला गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. व्हिडीओच्या चित्रिकरणादरम्यान पूनम पांडेजवळ उभ्या असलेल्या दोन पोलिस कर्मचार्यां नाही निलंबित करण्यात आले आहे. कॅनकोना पोलिसांनी पूनमला अगौदा येथील रिसॉर्टमधून अटक केली आहे. या प्रकरणात अश्लील फोटो शूट करणार्याक अज्ञात व्यक्तीवरही गुन्हा दाखल आहे.

या प्रकरणात गोवा फॉरवर्ड पार्टीच्या वुमेन विंगकडून पूनम विरोधात तक्रार देण्यात आली आहे. सध्या कोविडच्या काळात धरणावर जाण्यासाठी सामान्य माणसाला बंदी असताना अशा प्रकारच्या शूटिंगला कशी परवानगी दिली जाते, असा आक्षेप फॉरवर्ड पार्टीने घेतला आहे. जल संपदा विभागातील सहाय्यक अभियंता यांनी देखील तक्रार केली आहे. आयपीसीच्या कलम २९४ अन्वये पूनमवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. पुढील कारवाईदरम्यान गोवा पोलिस पूनमला हजर राहण्याचे आदेश देऊ शकतात. दक्षिण गोव्याचे एसपी पंकज कुमार सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

दरम्यान, अभिनेत्री पूनम पांडेने नुकतंच तिचा प्रियकर सॅम बॉम्बेसोबत लग्न केले होते. लग्नाच्या 2 आठवड्यानंतर नवदाम्पत्यामध्ये भांडण झांलं. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. हनीमूनवर असताना पती सॅम बॉम्बेने मारहाण केल्याची तक्रार पूनम पांडेने केली होती. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली. त्यानंतर अभिनेत्रीने आपल्या पतीविरूद्धची तक्रार मागे घेतली, त्यानंतर पूनमच्या पतीला जामीन मिळाला. आता दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे.

Updated : 5 Nov 2020 11:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top