Home > News > बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहिरीत सापडला

बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहिरीत सापडला

बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहिरीत सापडला
X

बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या 16 वर्षीय तरुणीचा विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. बीडच्या गेवराई तालुक्यात असणाऱ्या गोविंदवाडी शिवारात ही घटना उघडकीस आलीय. ही तरुणी 16 नोव्हेंबरला पहाटे घरातून निघून गेली होती. घरातून बाहेर पडताना तिने, मी मरतीये, माझा शोध घेऊ नका व कोणालाच जबाबदार धरू नका, अशी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यानंतर तिचा शोध घेण्यात आला. पण आता तिचा मृतदेह आढळल्याने एकचं खळबळ उडाली आहे. तिने अशी चिठ्ठी का लिहिली होती याचे कारण अजून समजू शकलेले नाही.

Updated : 18 Nov 2020 3:00 PM GMT
Next Story
Share it
Top