Home > News > दोन दिवसांपासून सनी लियोनी ट्रेंडिंगला जाणून घ्या कारण...

दोन दिवसांपासून सनी लियोनी ट्रेंडिंगला जाणून घ्या कारण...

दोन दिवसांपासून सनी लियोनी ट्रेंडिंगला जाणून घ्या कारण...
X

उत्तरप्रदेश पोलिस भरती परीक्षा दोन दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. याचे कारण म्हणजे या भरती परीक्षेत लाखो उमेदवारांनी घेतलेला सहभाग, आणि रेल्वे स्थानकावरील प्रचंड गर्दीचे व्हायरल होत असलेले फोटो. पण आणखी एका कारणास्तव, लोक सोशल मीडियावर ही परीक्षा मोठ्या उत्साहाने वाचत आहेत आणि व्यवस्थेच्या मूर्खपणावर हसत आहेत. याचे कारणही तसेच आहे, ते म्हणजे चक्क बोल्ड अभिनेत्री सनी लियोनी उत्तरप्रदेश पोलिस दलात सामील होणार असल्याच्या बातम्या. खरंच सनी लियोनी उत्तरप्रदेश पोलिस दलात सामील होणार का ? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवट पर्यन्त नक्की पाहा . आघाडीची पोर्नस्टार ते बॉलीवूड स्टार असा प्रवास करणारी अभिनेत्री सनी लियोनी उत्तर प्रदेश पोलीस दलात सामील होणार का ? असे ट्रेंड साद्या सोशल मीडियावर चालू आहेत. याचे कारण ही असेच आहे, ते म्हणजे बोल्ड अभिनेत्री सनी लियोनीचे व्हायरल होत असलेले अॅडमिट कार्ड, ज्यावर चक्क सनी चे नाव आणी फोटो देखील आहेत. सनी लियोनी उत्तरप्रदेश पोलिस दलात सामील होणार का ? असे प्रश्न पुढे येत तर आहेतच

पण या प्रवेशपत्रामुळे परीक्षार्थी ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच धक्का बसला आहे. सनी लिओनीचे फोटो असलेले ॲडमिट कार्ड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वास्तविक, हे प्रवेशपत्र सर्वप्रथम महोबा जिल्ह्यातून प्रसिद्ध करण्यात आले होते. आणि येथे परीक्षा देण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांमध्ये या प्रवेशपत्राची जोरदार चर्चा सुरू झाली . सनी लिओनीचे नाव आणि फोटो असलेले प्रवेशपत्र सर्वांच्या ओठावर होते.

वास्तविक, यूपी पोलीस कॉन्स्टेबलच्या 60244 पदांच्या भरतीसाठी दोन दिवसीय परीक्षा घेतली जात होती. या परीक्षेत 48 लाखांहून अधिक उमेदवारांनी भाग घेतला होता. परीक्षेच्या पहिल्या दिवशी म्हणजे १७ फेब्रुवारीला अनेक केंद्रांवर परीक्षा पार पडल्या. आणि विशेष म्हणजे त्यातही अनेक 'मुन्नाभाई' अडकले. पण कन्नौज जिल्ह्यातून सनी लियोनीचे प्रवेशपत्र बाहेर येताच खळबळ उडाली आणि काही वेळातच हे प्रकरण यूपीची हद्द ओलांडून अखिल भारतीय पातळीवर चर्चेचा विषय बनले.

वास्तविक, ते प्रवेशपत्र अभिनेत्री सनी लिओनीच्या नावाने जारी करण्यात आले होते. त्यात अभिनेत्रीच्या दोन छायाचित्रांचाही समावेश करण्यात आला होता. ही माहिती अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यावर सर्वजण एकमेकांकडे डोकावू लागले. काही वेळातच संपूर्ण प्रशासकीय कर्मचारी कामाला लागले.

प्रवेशपत्रात जे लिहिले आहे त्यानुसार उमेदवाराला श्रीमती सोनश्री मेमोरियल गर्ल्स कॉलेज, तिरवा येथे परीक्षेला बसायचे होते. ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना आणि कॉलेजला जेव्हा उमेदवारांच्या यादीत सनी लिओनीची माहिती मिळाली तेव्हा त्यांना धक्काच बसला. काही वेळातच सनी लिओनीच्या नावाने जारी केलेले प्रवेशपत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, परीक्षेशी संबंधित अधिकारी याला कोणाचा तरी खोडसाळपणा असल्याच मानत आहेत.

सध्या प्रवेशपत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे. उमेदवारांच्या नावावर सनी लिओनीचे नाव आणि फोटो असलेले प्रवेशपत्र प्रसारित केल्याचा मुद्दा राज्यभर चर्चेत आहे. या अनोख्या प्रकरणात, संबंधित परीक्षार्थी म्हणतो की प्रवेशपत्रात सनी लिओनीचे नाव आणि फोटो कसा आला याबद्दल त्याला काहीही माहिती नाही. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण मुन्नाभाई टोळीशी संबंधित असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी आता तपासाला गती दिली आहे. आशा प्रकारे एखाद्या अभिनेत्रीच्या नावाचा आणि फोटोंचा गैरवापर तुम्हाला किती योग्य वाटतो.

Updated : 19 Feb 2024 1:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top