Home > News > फक्त ५ रुपयांचे मीठ वापरून तुमच्या माठात फ्रिजसारखं थंड पाणी मिळवा

फक्त ५ रुपयांचे मीठ वापरून तुमच्या माठात फ्रिजसारखं थंड पाणी मिळवा

फक्त ५ रुपयांचे मीठ वापरून तुमच्या माठात फ्रिजसारखं थंड पाणी मिळवा
X

उन्हाळा सुरु झाला आहे आणि अनेकांना फ्रिजचे पाणी पिण्याची सवय आहे. पण फ्रिजचे पाणी आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. त्याऐवजी माठातले पाणी पिणे चांगले. पण माठातले पाणी कधीकधी फार थंड नसते.

आज आम्ही तुम्हाला एक अशी सोपी ट्रिक सांगणार आहोत ,ज्याद्वारे तुम्ही तुमच्या माठात फ्रिजसारखं थंड पाणी ठेवू शकता. आणि यासाठी तुम्हाला फक्त ५ रुपयांचे मीठ लागणार आहे! माठातलं पाणी फ्रिज सारख थंडगार ठेवण्यासाठी एका माठाची आवश्यकता आहे, मीठ, पाणी आणि त्यासोबतच पोत्याचा कपडा इत्यादि साहित्य असणे गरजेचे आहे.

माठातलं पाणी फ्रिज सारख थंडगार करण्यासाठी तुम्हाला या कृती कराव्या लागतील; सर्वप्रथम माठ स्वच्छ धुवा आणि त्याला मीठ लावून स्क्रबनीने घासा. यामुळे माठातले बंद छिद्र उघडतील आणि पाणी थंड होण्यास मदत होईल. यानंतर माठ पूर्णपणे पाण्याने भरा आणि एका मोठ्या पाण्याने भरलेल्या टबमध्ये २० मिनिटे ठेवा. एका ग्लासमध्ये पाणी घ्या आणि त्यात मीठ टाका. हे ग्लास असलेले मीठ पाणी माठात टाका आणि ५ मिनिटे ठेवा. ५ मिनिटांनंतर माठ स्वच्छ धुवा. पोत्याचा कपडा पाण्यात भिजवून नीट पिळून घ्या. हा कपडा ज्या ठिकाणी तुम्हाला माठ ठेवायचा आहे तिथे पसरवा आणि त्यावर माठ ठेवा. माठात पाणी भरा आणि रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला तुमच्या माठात फ्रिजसारखं थंड पाणी मिळेल!

तुम्ही जितकं जास्त मीठ वापराल तितकं पाणी जास्त थंड होईल.

तुम्ही माठ थंड ठेवण्यासाठी त्याला सावलीत ठेवा.

तुम्ही माठात थंड पाणी टाकल्यास ते लवकर थंड होईल.

तुम्ही माठात काही पुदिना किंवा टाकून त्याला चवदार बनवू शकता.

अशा प्रकारे तुम्ही फक्त ५ रुपयांचे मीठ वापरून तुमच्या माठात फ्रिजसारखं थंड पाणी मिळवू शकता. हे आरोग्यासाठी चांगले आहे आणि तुमच्या पैसेही वाचतील!

Updated : 9 May 2024 6:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top