Home > News > गौतमी पाटील कडून उदयन महाराजांना खास गिफ्ट...

गौतमी पाटील कडून उदयन महाराजांना खास गिफ्ट...

गौतमी पाटील कडून उदयन महाराजांना खास गिफ्ट...
X

महाराष्ट्रात कुठल्याही गावात जत्रा असू दे यात्रा असू दे काहीही म्हणा सध्या एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे गौतमी पाटील. तिच्या लावणी नृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ती प्रसिद्ध झाली. गौतमी पाटील या नावाने महाराष्ट्रात अनेक वाद सुद्धा निर्माण केले त्या ज्या प्रकारे हावभाव करत नृत्य करत होत्या त्यावरून त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं, त्यांच्या कार्यक्रमांना विरोध करण्यात आला आणि या सगळ्या प्रकारानंतर त्यांनी स्वतः सर्वांची माफी मागितली.. आणि इथून पुढे असभ्य वाटेल असे नृत्य करणार नसल्याचं सांगितलं. आता माफी मागितली खरंतर गौतमी पाटील हे प्रकरण संपेल, मागे पडेल असं सर्वांना वाटत होतं. पण नाही दिवसेंदिवस महाराष्ट्रात हे नाव गाजत आहे, या नावाची चर्चा या ना त्या कारणाने वारंवार होताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा गौतमीच नाव चर्चेत आहे. आता हे नाव चर्चेत असण्याचं असं काही खास कारण नाही आहे. गौतमी पाटील या कलाकाराने काल खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आणि त्यांच्या याचं भेटीचे काही फोटो समाज माध्यमांवर सध्या जोरदार व्हायरल होत आहेत. गौतमी उदयन महाराजांना भेटण्यासाठी का गेली? या भेटी मागं नक्की काय कारण होतं? जाणून घेण्यासाठी संपूर्ण माहिती वाचा...

सबसे कातील गौतमी पाटील हे वाक्य आता खेड्यापाड्यात प्रचलित झाला आहे साधारण मागच्या वर्षभरापूर्वी संपूर्ण राज्यातील तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही प्रसिद्ध लावणी डान्सर गौतमी पाटील. गौतमी सोमवारी सातारमध्ये होती आणि सातारा मध्ये असताना तिने भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. अगदी त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच जलमंदिर या ठिकाणी जात तिनं त्यांची सदिच्छा भेट घेतली. खास म्हणजे गौतमीने या भेटीत उदयनराजे भोसले यांना त्यांच्या आवडीचा परफ्युम गिफ्ट दिला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत गौतमीने विविध विषयांवर चर्चा केली. तिचा एक नवीन चित्रपट येतोय, घुंगरू असं या चित्रपटाचं नाव आहे. या भेटीनंतर गौतमी न माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी तिने उदयनराजे भोसले हे आमचे दैवत आहेत त्यामुळे मी त्यांच्यापेक्षा मोठी नाही त्यांची माझी बरोबरी नको ते दैवत असल्याचं म्हटलं आहे. बाकी गौतमीच्या डान्स बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा..

Updated : 16 May 2023 9:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top