Home > News > करण जौहरच्या धर्मात अदानी?

करण जौहरच्या धर्मात अदानी?

करण जौहरच्या धर्मात अदानी?
X

बॉलीवुडाचा लाडका दिग्दर्शक आणि पहिल्या क्रमांकाचा चित्रपट निर्माता करण जौहर याच्यासाठी २०२१ हे वर्ष आनंद घेऊन आलंय. करण जौहर आगामी काळात बॉलीवुडचे मोठे मोठे कलाकार असलेले बिग बजेट चित्रपट आपल्या भेटीला घेऊन येणार आहे. हे चित्रपट करण्यासाठी करणला खूप पैशांची गरज लागणार आहे. हीच गरज पूर्ण करण्यासाठी भारताती प्रसिद्ध उद्योगपती अदानी ग्रुपचे मालक गौतम अदानी हे करणला मदत करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे.

गौतम अदानी हे करणच्या धर्मा प्रोडक्शन मधील ३० टक्के शेअर्स विकत घेणार आहेत. अशी बातमी बॉलीवुड हंगामाच्या विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. करण सध्या रणवीर-आलिया आणि बॉलीवुडचे बिग-बी अमिताभ बच्चन असलेल्या 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटाचे बजेट ३०० कोटींच्या वर गेलं आहे. आणि चित्रपट अद्यापही अपूर्णच आहे.

करण जौहरची कंपनी धर्मा प्रोडक्शन ही बॉलीवुडमधली सर्वात मोठी आणि सर्वाधिक चित्रपट बनवणारी चित्रपट निर्मिती कंपनी आहे. जुग जुग जियो, शेरशाह, रणभूमि, दोस्ताना २ ते सूर्यवंशी या बिग बजेट चित्रपटांबरोबरच दीपिकाच्या तख्त या चित्रपटाची निर्मितीही धर्मा प्रोडक्शन करत आहे. लवकरच हे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत.

अशात करणला आर्थिक दृष्या मदतीचा हात हवाच आहे. तो गौतम अदानी देऊ शकतात. गौतम अदानी भारतातील एक यशस्वी उद्योगपती आहेत. विविध क्षेत्रात त्यांनी गुंतवणूक केली आहे. अलिकडेच त्यांनी यूपीमध्ये ३५ हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. जर करणचा आणि गौतम अदानी यांचा करार झाला तर अदानी करण मिळून बॉलिवूडमधील चित्र बदलू शकतात. तसेच धर्माच्या माध्यमातून गौतम अदानी बॉलीवुडमध्येही आपल्या व्यवसायाची पाळंमुळं रोवू शकतात.

Updated : 5 Jan 2021 1:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top