Home > News > कोरोनामुळे आई-वडीलांना गमावलेल्या विद्यार्थ्यांची फी माफ होणार; उद्यापर्यत घोषणा होण्याची शक्यता

कोरोनामुळे आई-वडीलांना गमावलेल्या विद्यार्थ्यांची फी माफ होणार; उद्यापर्यत घोषणा होण्याची शक्यता

कोरोनामुळे आई-वडीलांना गमावलेल्या विद्यार्थ्यांची फी माफ होणार;  उद्यापर्यत घोषणा होण्याची शक्यता
X

मुंबई: कोरोनामुळे आई-वडीलांना गमावलेल्या विद्यार्थ्यांसाठी सरकराने दिलासादायक निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मृत्यू झाला आहे अशा विद्यापीठातील (अकृषी) विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करण्यात येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना ही माहिती दिली.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांच्या घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने कुटुंब रस्यावर आला आहे. यात अनेक विद्यार्थ्यांनी आई, वडिल गमावले असल्याने त्यांना पुढील शिक्षणासाला मुकावे लागणार असल्याचे चित्र होते.

मात्र, सामंत यांची कुलगुरूंसोबत सकारात्मक चर्चा झाली असून, विद्यापीठाच्या फीमध्ये कपात होऊन विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक विद्यापीठांचे फी बाबतचे धोरण वेगवेगळे आहेत. त्यामुळे कोणत्या विद्यापीठांचे शुल्क किती कमी होणार यासंदर्भात संध्याकाळी कुलगुरु चर्चा करतील आणि त्यानंतर उद्यापर्यत याबाबतचा निर्णय येईल अशी माहिती सामंत यांनी दिली आहे.

Updated : 29 Jun 2021 7:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top