Home > News > स्वातंत्र्यवीरा आणि कवयित्री सरोजिनी नायडू

स्वातंत्र्यवीरा आणि कवयित्री सरोजिनी नायडू

13 फेब्रुवारी, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रगण्य नेत्या आणि रसिक कवयित्री असलेल्या सरोजिनी नायडू यांचा जयंतीदिन साजरा केला जात आहे. त्यांच्या कार्याचा स्मरण करून देशभर त्यांचा आदराने गौरव केला जातो.

स्वातंत्र्यवीरा आणि कवयित्री सरोजिनी नायडू
X

13 फेब्रुवारी, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रगण्य नेत्या आणि रसिक कवयित्री असलेल्या सरोजिनी नायडू यांचा जयंतीदिन साजरा केला जात आहे. त्यांच्या कार्याचा स्मरण करून देशभर त्यांचा आदराने गौरव केला जातो.व

सरोजिनी नायडू या महात्मा गांधी यांच्या अतिशय जवळच्या नेत्या होत्या, सरोजिनी नायडू यांनी ब्रिटिश राजवटी विरोधात दंड थोपटून असहकार चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवला होता. तसेच महिलांच्या हक्कांसाठी आग्रही महिला नेत्यांपैकी एक म्हणून सरोजिनी नायडू यांना ओळखल जात. 'भारतीय राष्ट्रीय काँग्रेस'च्या पहिल्या महिला अध्यक्षा महणून सरोजिनी नायडू यांनी १९२५ मध्ये कॉंग्रेसची कमान सांभाळली असून, दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांच्या स्थितीत सुधारणा व्हावी यासाठीचे काम आणि केलेल कार्य आजही अजरामर आहे. महात्मा गांधीजींच्या चळवळीच्या सरोजिनी नायडू मजबूत आधारस्तंभ होत्या.

भावुक आणि रसिक लेखन शैलीतून सरोजिनी नायडू यांनी "द गोल्डन थ्रेशहोल्ड" आणि "बर्ड ऑफ टाइम" सारख्या प्रसिद्ध कविता संग्रहांची निर्मिती करून भारतीय संस्कृती आणि समाजाचे वास्तव चित्रण केले. यामुळे त्यांना "भारताची कोकिळा" म्हणून सुद्धा ओळखले जाते.

स्वातंत्र्यपूर्व काळात सरोजिनी नायडू यांनी महिला शिक्षण आणि स्वावलंबनावर भर दिला. त्यांनी बालविवाह आणि अन्यायी प्रथांचा विरोध करून बालविवाह सारख्या अनिष्ट प्रथांना आळा बसावा यासाठी कार्य केले. महिलांचा राजकारण आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असला पाहिजे अशी सरोजिनी नायडू यांची सततची धारणा राहिलेली आहे.

आजच्या राष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सरोजिनी नायडू यांचे कार्य आपल्याला एक प्रेरणास्रोत आहे. स्वातंत्र्य, समानता आणि सामाजिक न्यायासाठी त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील.

Updated : 13 Feb 2024 4:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top