Home > News > अमेरिकन लुटेरी दुल्हनने वीज कर्मचाऱ्याला दिला ४० लाखाचा झटका

अमेरिकन लुटेरी दुल्हनने वीज कर्मचाऱ्याला दिला ४० लाखाचा झटका

अमेरिकन लुटेरी दुल्हनने वीज कर्मचाऱ्याला दिला ४० लाखाचा झटका
X

मुंबई: भावासाठी विदेशी नवरी शोधणे एका वीज कर्मचाऱ्याला चांगलच महागात पडले. लग्नासाठी नवरी शोधणाऱ्या नागपुरातील मनिषनगर येथे राहणाऱ्या सुनील सुरेश देऊळवार यांना अमेरिकन लुटेरी दुल्हनने तब्बल ४० लाखाचा चुना लावून फसवणूक केली आहे. याप्रकरणी नागपूरच्या बेलतरोडी पोलिसात 16 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याच झालं असं की, सुनील देऊळवार हे वीज मंडळात नोकरीला आहेत. त्यांचा भाऊ सुशील अविवाहित असल्याने सुनील अनेक दिवसांपसून त्याच्यासाठी मुलगी शोधत होते. याच काळात त्यांनी भारत मेट्रीमनी या वेबसाईटवर सुशील या नावाने खाते तयार केले. या माध्यमातून न्यू जर्सी (यूएसए) येथे राहणार्‍या सुचिता दास या महिलेला सुनील रिक्वेस्ट पाठवली. सुनील देऊळवार यांनी पाठविलेली रिक्वेस्ट सुचिताने मान्य केली.

पुढे जर्सी हिच्या सोबत त्यांची ओळख झाली. दहा ते पंधरा दिवस दोघांमध्ये चांगल्या गप्पा झाल्यात. याचवेळी देऊळवार यांनी 'तुमच्याकडे मोबाईल अतिशय स्वस्तात मिळतात' असे म्हटले. त्यावर सुचिताने 'तुम्ही धार्मिक लोक आहात. तुम्हाला दान देणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यासाठी मोबाईल, लॅपटॉप आणि एक लाख यूएसए डॉलर पाठवितो' असे म्हटले. हे ऐकून देऊळवार यांचा आनंद गगनाला भिडला.

काही दिवसांनी ऑस्टिन व्हाईट या इसमाने देऊळवार यांना फोन करून मोबाईल, लॅपटॉप आणि एक लाख डॉलर पाठविल्याचे सांगून दिल्ली येथील विमानतळावरून माल ताब्यात घ्या असे सांगितले. दरम्यान दिल्ली येथून बोलत असल्याचे सांगत वेगवेगळ्या नावानी देऊळवार फोन आले, तसेच यूएसए आलेले पार्सल सोडविण्यासाठी वेगवेगळे कारणे सांगून त्यांना बँकेत पैसे भरण्यास सांगितले. एक लाख यूएसए डॉलरच्या मोहात देऊळवार यांनी तब्बल 40 लाख 64 हजार 853 रुपये पाठवले, मात्र आपली फसवणूक झाली असल्याचं लक्षात त्यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला.

Updated : 12 July 2021 5:36 AM GMT
Next Story
Share it
Top