Home > News > दिल्ली: माजी केंद्रीय मंत्र्यांच्या पत्नीची हत्या

दिल्ली: माजी केंद्रीय मंत्र्यांच्या पत्नीची हत्या

दिल्ली: माजी केंद्रीय मंत्र्यांच्या पत्नीची हत्या
X

देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये मंगळवारी रात्री एक मोठी घटना समोर आली असून, माजी केंद्रीय मंत्री पी.आर. कुमारमंगलम (P R Kumarmangalam) यांची पत्नी किट्टी कुमारमंगलम यांची दिल्लीतील वसंत विहार भागात त्यांच्या राहत्या घरात हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 67 वर्षीय किटी मंगलम यांची उशीने तोंड दाबून हत्या करण्यात आली. घरातील धोबी आणि त्याच्या दोघा साथीदारांनी हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपी मुख्य आरोपी असलेल्या राजू नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.

मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दरवाजाची बेल वाजवून धोबी घरात आला. धोबी सोबतच आणखी दोन जण पाठोपाठ घरात शिरले. आत आल्यानंतर तिघांनी सुरवातीला घरातील मोलकरणीला एका खोलीत बंद केलं. तसेच घरात चोरी केल्यानंतर किटी कुमारमंगललम यांची उशीने तोंड दाबून हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Updated : 7 July 2021 3:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top