‘देवा... बाबांना लवकर बरं कर’ शर्मिष्ठा मुखर्जी यांचं भावनीक ट्वीट
X
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही चिंताजनकच आहे. आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून तेथील डॉक्टरांनी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. प्रणव मुखर्जी यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं आहे.
दरम्यान, कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या वडिलांच्या आरोग्यात लवकर सुधारणा व्हावी यासाठी ट्विट केले आहे. “गेल्या वर्षी आठ ऑगस्टला बाबांना भारतरत्न किताबाने सन्मानित करण्यात आले होते. माझ्या आयुष्यातील आनंदाच्या क्षणांपैकी तो एक क्षण आहे. त्यानंतर एक वर्षाने परिस्थिती बदलली आहे. माझे वडील खूप आजारी आहेत. त्यांना बरं कर. सर्व सुखदु:ख सहन करण्याची त्यांना शक्ती दे.” अशी प्रार्थना त्यांनी ईश्वराकडे केली आहे.
दरम्यान, मेंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतरही माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नसल्याची माहिती आहे.
https://twitter.com/Sharmistha_GK/status/1293409462758199296