Home > News > माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचं निधन…

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचं निधन…

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचं निधन…
X

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी यांचे रात्री निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७५ वर्षांच्या होत्या. मागच्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. दादर इथल्या स्मशानभूमित त्यांच्यावर अंतिमसंस्कार केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अनघा यांचा 14 मे 1964 रोजी मनोहर जोशी यांच्याशी विवाह झाला होता. त्यांचं माहेरचं नाव होतं मंगल हिगवे. त्यांचा जन्म 2 जानेवारी 1945 रोजी झाला. अनघा जोशी यांच्या पश्चात पती मनोहर जोशी, पुत्र उन्मेष जोशी, अस्मिता आणि नम्रता या दोन कन्या, जावई गिरीश व्यास असं मोठं कुटुंब आहे.

आतापर्यंत संपूर्ण वाटचालीमध्ये मनोहर जोशी यांच्या पाठीमागे त्या खंबीर उभ्या राहिल्या. त्यांनी मनोहर यांना राजकीय व सामाजिक जीवनात मोलाची साथ दिली.

Updated : 3 Aug 2020 8:58 AM IST
Next Story
Share it
Top