Home > News > 'गर्भवती वनरक्षक महिलेला बेदम मारहाण' व्हिडिओ व्हायरल

'गर्भवती वनरक्षक महिलेला बेदम मारहाण' व्हिडिओ व्हायरल

गर्भवती वनरक्षक महिलेला बेदम मारहाण व्हिडिओ व्हायरल
X

एका महिलेला मारहाण करतानाचा एक संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. सातारा जिल्ह्यातील माजी सरपंच व त्याच्या पत्नीने मिळून एक गर्भवती वनरक्षक महिलेसह पतीला बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही या घटनेची दखल घेतली आहे. सातारा तालुक्यातील पळसवडे येथील माजी सरपंचाने वनरक्षक महिला कर्मचाऱ्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे‌ यामध्ये मारहाण झालेली महिला कर्मचारी या तीन महिन्याच्या गर्भवती असून त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची नोंद सातारा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे ही वनरक्षक महिला 3 महिन्यांची गर्भवती आहे. मला न विचारता वन मजूर दुसरीकडे का नेले या कारणातून चिडून जाऊन वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी मारहाण केली आहे.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही या घटनेची दखल घेतली आहे. "आरोपीला आज सकाळी अटक करण्यात आली असून त्याला कायद्याचा कठोरात सामना करावा लागणार आहे. असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही." असे ट्वीट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

Updated : 20 Jan 2022 7:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top