Home > News > विकृती : पाच वर्षांच्या मुलीवर शाळेच्या शिपायाकडूनच लैंगिक अत्याचार

विकृती : पाच वर्षांच्या मुलीवर शाळेच्या शिपायाकडूनच लैंगिक अत्याचार

विकृती : पाच वर्षांच्या मुलीवर शाळेच्या शिपायाकडूनच लैंगिक अत्याचार
X

लैंगिक अत्याचारांची विकृती ही गेल्या काही काळात प्रचंड वाढली आहे. दिल्लीपेक्षाही सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुंबईत देखील आता विकृत गुन्हे घडू लागले आहेत. मुलुंड पूर्वेकडील एका नामांकित शाळेमध्ये साडे पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सोमवारी या शाळेच्या पटांगणामध्ये साडे पाच वर्षाची मुलगी खेळत असताना शाळेचा शिपाई हेमंत वैती याची नजर या मुलीवर पडली. उन्हाळी सुट्टी पडली असल्यामुळे शाळेमध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत या शिपायाने मुलीला शाळेतील एका केबिनमध्ये नेले आणि त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले यानंतर या मुलीने घडलेला प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी थेट नवघर पोलिस ठाणे गाठले आणि शिपाया विरोधात गुन्हा दाखल केला. वैती याला पोलिसांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारी नंतर अटक केली असून त्याच्यावर पोकसो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Updated : 24 May 2022 11:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top