Home > News > 'एका शस्त्रक्रियेने मला माझी ओळख दिली' लिंगपरिवर्तन शस्त्रक्रियेनंतर राजराजेश्वरी यांची प्रतिक्रिया

'एका शस्त्रक्रियेने मला माझी ओळख दिली' लिंगपरिवर्तन शस्त्रक्रियेनंतर राजराजेश्वरी यांची प्रतिक्रिया

मी एका जन्मातून मुक्त होऊन माझ्या मूळरूपात आल्याची भावना राजराजेश्वरी यांनी व्यक्त केली.

एका शस्त्रक्रियेने मला माझी ओळख दिली लिंगपरिवर्तन शस्त्रक्रियेनंतर राजराजेश्वरी यांची प्रतिक्रिया
X

आपण दुसऱ्याच्या शरीरात जन्म घेतला असल्याची वेदना मला कळायला लागली त्या वयापासूनच मी सर्व काही सोसत आले होते. माझे पुरुषी शरीर आपले नाही, याची जाणीव मला बालवयातच झाली होती. मी मुलींसारखी वागायची हे माझे वागणे सर्वांनाच खटकत होते मला कोणीच समजू घेत नव्हते. अखेर मी घर सोडले आणि धर्मस्थळांचा आधार घेतला. सज्ञान झाल्यावर सामाजिक कार्यकर्त्यांच्या सान्निध्यात आले व योग्य मार्गदर्शन मिळाले. अशी भावना राजराजेश्वरी यांनी व्यक्त केली. राजराजेश्वरी यांच्यावर सावंगी मेघे येथे लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या.

रुग्णालयात योग्य उपचार मिळाले आणि एका शस्त्रक्रियेने मला माझी ओळख दिली. मी एका जन्मातून मुक्त होऊन माझ्या मूळरूपात आले, याचा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही असे राजराजेश्वरी यांनी म्हटले आहे. या पत्रकार परिषदेला शल्यचिकित्सक डॉ. यशवंत लामतुरे, प्लास्टिक सर्जन डॉ. विवेक सुपाहा, मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. प्रदीप पाटील, जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, सामाजिक कार्यकर्त्या सविता पांडे, दीपक ओबेरॉय हे देखील उपस्थिती होते.

Updated : 13 Aug 2021 8:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top