गोदी मीडियाला महाराष्ट्र पोलिसांचा पहिला धक्का..
X
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. तर त्या वक्तव्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटले होते. त्यातच नुपूर शर्मा यांच्यावर अटकेची कारवाई करण्याची मागणी केली जात असताना आता टाईम्स नाऊच्या अँकर नाविका कुमार यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटले. त्यापाठोपाठ नुपूर शर्मा यांच्यावर अटकेची कारवाई करण्याची मागणी करत शुक्रवारी देशात निदर्शने झाली. तर आता मुंबई पोलिसांनी टाईम्स नाऊच्या अँकर नाविका कुमार यांच्यावर एफआयआर दाखल केला आहे.
टाईम्स नाऊच्या कार्यक्रमात नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त टिपण्णी केली होती. त्यामुळे या कार्यक्रमात मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्याच्या माध्यमातून नाविका कुमार यांनी धार्मिक भावना भडकावल्याचा दावा करत त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
एका मुस्लिम धर्मगुरूने केलेल्या तक्रारीनंतर परभणी जिल्ह्यातील नानलपेठ पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. या एफआयआरमध्ये नुपूर शर्मा यांचे नाव आहे.
नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर निर्माण झालेल्या वादापासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा दावा टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीने केला होता. तसेच या वक्तव्याला आम्ही समर्थन दिले नसल्याचेही त्यांनी म्हटले होते. याबरोबरच आम्ही आमच्या चर्चेदरम्यान सहभागींना सहकारी सदस्यांच्या विरोधात असंसदीय भाषेत बोलू नये, असं आवाहन करत असल्याचेही म्हटले होते.
तसेच निर्माण झालेल्या वादानंतर मॅक्स महाराष्ट्रनेही अशा प्रकारे वादग्रस्त चर्चा घडवून आणणाऱ्या आणि समाजात विष पेरणाऱ्या चॅनल्सवर आणि त्यांच्या अँकरवर टीका केली होती. तसेच एडीटर्स गिल्डने या टाईम्स नाऊ विषारी आवाजाला प्रोत्साहन देत असल्याचे म्हटले होते.
स्वातंत्र्य म्हणजे 'भीक' ते मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त टिपण्णी
टाईम्स नाऊच्या अँकर नाविका कुमार विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे काय चर्चेत असतात. त्यातच त्यांनी यापुर्वी कंगणा रनौतची मुलाखत घेतली होती. त्यावेळी १९४७ साली देशाला स्वातंत्र्य भीकेत मिळाल्याचे वादग्रस्त वक्तव्य कंगणा रनौतने केले होते. तर २०१४ साली देशाला खरे स्वातंत्र्य मिळाल्याचा दावा करण्यात आला होता. या वक्तव्याचेही नाविका कुमार यांनी पाठराखण केली होती. त्यामुळे नाविका कुमार वादात सापडल्या होत्या. मात्र टाईम्स नाऊवर झालेल्या टीकेनंतर कंगणाने केलेले वक्तव्य स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान असल्याची भुमिका टाईम्स नाऊने घेतली होती. त्यामुळे आता टाइम्स नाऊच्या अँकर नाविका कुमार यांच्यावर एफआयआर दाखल झाल्याने हा गोदी मीडियाला महाराष्ट्र पोलिसांचा पहिला धक्का मानला जात आहे.