Home > News > आंतरराष्ट्रीय टेनिसपटु विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

आंतरराष्ट्रीय टेनिसपटु विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

आंतरराष्ट्रीय टेनिसपटु विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
X

दिल्लीतील गुरगाव येथील एक बिल्डरच्या प्रोजेक्टच्या जहिरातीविरोधात फसवणुक आणि विश्वासघाताचा गुन्हा एका महिलेने दाखल केला आहे.ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे त्यांच्यामध्ये आंतरराष्ट्रीय टेनिसपटु मारिया शारावोवा आणि फार्मूला-१ गाड्यांचे रेसर मायकल शूमाकर चेही नाव आहे.



छत्रपूरमध्ये राहणारी शैफाली अग्रवाल यांनी २०१३ मध्ये एका बिल्डरच्या जहिरातीपत्रकावर मारीया शारापोवा आणि मायकल शूमाकर चे नाव पाहुन सेक्टर ७३ मधील एका बांधकाम प्रकल्पामध्ये इन्वेस्ट केले होते.या महिल्यांच्या तक्रारीनंतर गुरगाव पोलिसांनी बिल्डर आणि जहिराती करण्याऱ्यांविरोधात ४०६, ४२० आणि १२० ब या कलमांनुसार एफ आय आर गुन्हा दाखल केला आहे.



महिलेचा आरोप आहे की मेसर्स रियलटेक डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने आलिशान घरासाठी प्रकल्पात पैसे गुंतवण्याची विनंती करण्यात आली होती.यानंतर बिल्डरकडून अनेक खोटी आश्वासनेही देण्यात आली. जाहिरातीत दाखवलेले फोटो पाहून गुंतवणूक केल्याचे महिलेने सांगितले. एका टॉवरदेखील निर्माण होइल त्याचे नाव मायकल शूमाकर असे ठेवण्यात येईल.असा उल्लेख जहिरात पत्रिकेवर करण्यात आला होता.



हा प्रकल्पही सुरू झाला नसल्याचा आरोप होत आहे. मानसिक त्रास आणि छळ सहन केल्यानंतर आणि संयम गमावल्यानंतर, महिलेने इतर तक्रारदारांसह बिल्डरला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती.




Updated : 17 March 2022 7:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top