Home > News > अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा मुंबई लोकल ट्रेनने प्रवास

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा मुंबई लोकल ट्रेनने प्रवास

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा मुंबई लोकल ट्रेनने प्रवास
X

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज एका अनोख्या उपक्रमात मुंबईतील लोकल ट्रेनने घाटकोपर ते कल्याण असा प्रवास करत प्रवाश्यांशी संवाद साधला. या प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाश्यांच्या समस्या आणि आर्थिक गरजा समजून घेण्याचा प्रयत्न केला असल्याच समजत आहे.

निर्मला सितारमन यांचा प्रवाशांसोबत चर्चा करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. माहिती देतांना भारतीय जनता पक्षाचे नेते विनोद तावडे यांनी त्यांच्या X हॅंडल वरून पोस्ट करत या उपक्रमाची माहिती दिली.

त्यांनी या उपक्रमाला 'स्तुत्य उपक्रम' म्हटले आहे. विनोद तावडे म्हणतात "आर्थिक राजधानी मुंबईच्या लोकल ट्रेनमधून घाटकोपर ते कल्याण असा प्रवास करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन पुढे ते म्हणतात " निर्मला सितारामन यांनी लोकांशी संवाद साधला आणि त्यांच्या आर्थिक गरजाही समजून घेतल्या.," अस विनोद तावडे यांनी X हॅंडलच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

सोशल मीडियावर अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. लोकांनी म्हटले आहे की, हे दर्शवते की सरकार आम आदमीच्या समस्या समजून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे.

वित्त मंत्री यांना प्रवाश्यांकडून मिळालेल्या माहितीचा उपयोग सरकारी धोरणे सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो. हा उपक्रम जनतेला सरकारी धोरण निर्मिती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणारा असून हा उपक्रम सरकार आणि जनतेमधील विश्वास मजबूत करेल.

केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करत प्रवाश्यांशी संवाद साधण्याचा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय आहे. हा उपक्रम सरकार आणि जनतेमधील संबंध मजबूत करण्यास मदत करेल का ? आणि आम आदमीच्या समस्यांचे निराकरण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडेल का हे पाहणे गरजेचे आहे.

Updated : 24 Feb 2024 1:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top