Home > News > निर्मला सीतारमण यांची कोव्हिडग्रस्त भागांसाठी 1 लाख 1 कोटी कर्ज हमी योजनेची घोषणा

निर्मला सीतारमण यांची कोव्हिडग्रस्त भागांसाठी 1 लाख 1 कोटी कर्ज हमी योजनेची घोषणा

निर्मला सीतारमण यांची  कोव्हिडग्रस्त भागांसाठी 1 लाख 1 कोटी कर्ज हमी योजनेची घोषणा
X

कोरोनाचा सर्वच क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. यावर देशातील कोव्हिडग्रस्त भागांसाठी मोदी सरकारने एका योजनेची घोषणा केली आहे. आज अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत निर्मला सितारमण यांनी कोव्हिडग्रस्त भागांसाठी 1 लाख 1 कोटींची कर्ज हमी योजनेची घोषणा केली आहे.

काय आहेत घोषणा?

कोव्हिडने प्रभावित झालेल्या क्षेत्रासाठी 1.1 लाख कोटी कर्ज हमीची घोषणा

यामध्ये आरोग्य क्षेत्रासाठी 50,000 कोटी दिले जाणार

इतर क्षेत्रासाठी 60,000 कोटी दिले जाणार

आरोग्य क्षेत्रासाठी जास्तीत जास्त 100 कोटीचं कर्ज घेता येणार आहे. या कर्जाचा व्याज दर 7.95 टक्के राहील. तर इतर क्षेत्रासाठी व्याज दर 8.25% राहणार आहे.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी थास करुन लहान मुलांच्या सेवांसाठी 23,220 कोटी दिले जाणार आहेत.

नवीन क्रेडिट गॅरंटी योजनेची घोषणा:

या योजनेअंतर्गत 25 लाख लोकांना मायक्रो फाइनेंस इंस्टीट्यूशंस च्या माध्यमातून फायदा होणार

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना ची मुदत 30 जून, 2021 होती. आता ती वाढवून 31 मार्च, 2022 केली आहे.

कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रवास सुरु झाल्यावर भारतात येणाऱ्या पहिल्या 5 लाख परदेशी व्यक्तींना 31 मार्च 2022 पर्यंत व्हिसासाठीचं शुल्क द्यावं लागणार नाही.

Updated : 28 Jun 2021 1:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top