Home > News > लॉकडाऊन काळात बाहेर फिरणाऱ्या दिशा पाटणीविरोधात गुन्हा दाखल

लॉकडाऊन काळात बाहेर फिरणाऱ्या दिशा पाटणीविरोधात गुन्हा दाखल

लॉकडाऊन काळात बाहेर फिरणाऱ्या दिशा पाटणीविरोधात गुन्हा दाखल
X

Courtesy -Social media

मुंबई: कारण नसतानाही लॉकडाऊन काळात बाहेर फिरत असल्याने अभिनेत्री दिशा पाटणी आणि बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यासह गाडी ड्रायव्हरवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिशा आणि टायगर हे दोन्ही ड्राईव्हसाठी निघाले असताना,वांद्र्यातील बँडस्टँडवर त्यांची गाडी पोलिसांनी अडवून कागदपत्रांची विचारपूस केली. मात्र, कारण नसतानाही लॉकडाऊन काळात बाहेर फिरत असल्याचं स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात लॉकडाऊनमध्ये काही ठिकाणी 1 तारखेपासून सूट देण्यात आली आहे. मात्र, तरीही कारण नसताना घरा बाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पण असं असतानाही काही जण नियम तोडत बाहेर फिरत असल्याने, पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.

Updated : 3 Jun 2021 2:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top