Home > News > ग्राहकाकडून वेट्रेसला इतकी टीप मिळाली की तिला थेट नोकरीच गमवावी लागली.

ग्राहकाकडून वेट्रेसला इतकी टीप मिळाली की तिला थेट नोकरीच गमवावी लागली.

ग्राहकाकडून वेट्रेसला इतकी टीप मिळाली की तिला थेट नोकरीच गमवावी लागली.
X

अनेक विद्यार्थी त्यांच्या खिशातील पैसे आणि शाळेची फी भरण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये अर्धवेळ काम करतात. अशीच एक विद्यार्थी रायन ब्रँड्ट एका रेस्टॉरंटमध्ये वेट्रेस म्हणून काम करत असे. एके दिवशी अचानक एक श्रीमंत माणूस रेस्टॉरंटमध्ये आला आणि रायनने त्याला जेवण दिले. रायनच्या सेवेवर तो माणूस इतका खूश झाला की त्याने तिला साडेतीन लाख रुपयांची टीप दिली.

श्रीमंताने वेट्रेसला दिली साडेतीन लाखांची टीप!

तुम्ही विचार करत असाल की ही खूप चांगली बाब आहे. पण इथेच ही गोष्ट खराब होते, कारण रायनचा आनंद फार काळ टिकत नाही आणि तीला तिची नोकरी गमवावी लागते. वास्तविक, जेव्हा रायनला 3.5 लाखांची टीप मिळाली तेव्हा रेस्टॉरंट मॅनेजरने तिला ती टीप बाकीच्या वेट्रेससोबत शेअर करण्यास सांगितली. रेस्टॉरंटच्या या निर्णयाने रायन आश्चर्यचकित झाली, कारण रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाने याआधी कोणालाही टीप शेअर करण्यास सांगितले नव्हते.

त्याचवेळी रायनला साडेतीन लाखांची टीप मिळाल्यावर रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाने पॉलिसीबाबत बोलून पैसे वाटून घेण्यास सांगितले. मात्र, रायनने ही गोष्ट टीप देणाऱ्या श्रीमंत व्यक्तीला सांगितली, कारण त्या व्यक्तीने रायनच्या सेवेवर खूश होऊन, तिची कहाणी जाणून घेत तिला साडेतीन लाख रुपयांची टीप दिली. ही बाब त्या व्यक्तीसोबत शेअर केल्याबद्दल रेस्टॉरंटने रायनला नोकरीवरून काढून टाकले.

यामुळे रेस्टॉरंटची तारांबळ उडाली

यानंतर वेट्रेसला टिप देण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रेस्टॉरंटमध्ये जेवण घेण्यासाठी आलेल्या एका व्यावसायिकाने सांगितले की, रायनची सेवा आणि त्याची चांगली वागणूक पाहून तो तिला साडेतीन लाखांची टीप देत आहे. हे ऐकून रायन रडायला लागते. रायनला वाटले की या टीपमुळे तिचं कर्जही फिटेल आणि ती शाळेची फीही भरू शकेल, पण नोकरी सुटताच तिचा आनंद क्षणार्धात मावळला.


Updated : 12 Dec 2021 4:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top