Home > News > पोलिसांनी पकडताच महिला चोरांनी केलं असं काही की,...

पोलिसांनी पकडताच महिला चोरांनी केलं असं काही की,...

पोलिसांनी पकडताच महिला चोरांनी केलं असं काही की,...
X

नाशिक: दिंडोरी तालुक्यातील वणी बसस्थानकातुन एसटी ने प्रवास करणा-या महिलेच्या पर्समधील ४४ हजारांची रोकड लंपास करणा-या महिला चोरांना रंगेहात पकडून त्यांच्याकडून चोरीची रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी पकडताच ह्या महिलांनी चांगलाच गोंधळ घातला मात्र पोलिसांनी खाक्या दाखवत त्यांना अटक केली आहे.

कळवण नाशिक बसमधून प्रवास करणाऱ्या मिना शिरसाठ व कमल पाटील ह्या दोन्ही महिला बसमध्ये गर्दी असल्याने दुस-या बसने जाण्यासाठी खाली उतरत असताना त्यांच्या पर्समधील ४४ हजार रुपये चोरी गेल्याचे त्यांना लक्षात आले. त्यांनी तात्काळ वणी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. त्यांनतर पोलिसांनी लगेच बसस्थानकात जाऊन संबधित बसची माहिती घेऊन कोणत्या दिशेनी गेली त्या रोडवर असलेल्या पोलिसांना माहिती दिली.

त्यांनतर पोलिसांनी बसचा पाठलाग करून बस थांबवली. बसमध्ये पोलिसांना दोन संशियत महिला दिसल्या ज्यांना मिना शिरसाठ यांनी लगेच ओळखले. पोलिसांनी चौकशी करताच या महिलांनी आरडाओरडा सुरु केली, तसेच आपल्या जवळ असलेल्या लहान मुलांना चिमटे घेऊन लोकांसमोर आरडाओरडा होईल या पद्धतीने कृत्य करण्यास सुरवात केली.

पण महिला पोलिसांनी खाक्या दाखवत त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चोरी झालेली रक्कम आढळून आली. रक्कम सापडताच त्यातील एका महिलेने डोक्याला धारदार वस्तुने जखम करून घेतली आणि गोंधळ घालायला लागली. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन आधी रुग्णालयात नेऊन उपचार केले आणि त्यांनतर चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Updated : 22 July 2021 5:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top