Home > News > तालिबानी नेत्याची मुलाखत घेणाऱ्या महिला Anchor ने देश सोडला

तालिबानी नेत्याची मुलाखत घेणाऱ्या महिला Anchor ने देश सोडला

तालिबानी नेत्याची मुलाखत घेणाऱ्या महिला Anchor ने देश सोडला
X

तालिबान नेत्याचा इंटरव्यू घेणाऱ्या महिला पत्रकाराला जगाने पाहिले. मात्र, त्या महिलेला आता अफगाणिस्तान सोडण्याची वेळ आहे. या महिला Anchor चं नाव बेहेश्ता अरघंद असल्याचं समजतंय. बेहेश्ता अरघंद ने ऑगस्टमध्ये तालिबानचा नेता अब्दुल्लाह चा इंटरव्यू केला होता.

विशेष म्हणजे तालिबानच्या मोठ्या नेत्याची अशा प्रकारे लाईव्ह मुलाखत घेणारी ती पहिली महिला पत्रकार होती. त्यामुळं जगभरात या इंटरव्यू ची जगभरात मोठी चर्चा झाली होती. मात्र, सोमवार (30 ऑगस्ट) ला या महिला Anchor ने CNN NEWS ला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे.

तिने सांगितलं की तालिबानच्या भीतीने तिने देश सोडला आहे. जोपर्यंत सुरक्षा व्यवस्था पुर्ववत होत नाही तोपर्यंत मी देशात परतणार नाही. मी देश सोडला कारण मी देखील इतरांप्रमाणे तालिबान्यांना घाबरते.

अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर देशात अंतर्गत गृहयुद्धाबरोबरच दहशतवादी हल्ले देखील वाढले आहेत.

सोमवारीच मिळालेल्या माहितीनुसार तालिबानी दहशतवादी समुह वुमन राइट एक्टिविस्ट आणि पत्रकार सायरा सलीम चा शोध घेत होते. सायरा सलीम ने तालिबान पीडितांसाठी लढा दिला आहे.चार दिवसांपुर्वी सायराच्या घरी काही तालिबानी आल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे.

Updated : 2021-08-31T10:58:00+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top