Fasting recipes for navratri : उपवासात तेच तेच खाऊन कंटाळलात? ट्राय करा
'मोरधन ढोकला' सह हटके झटपट रेसिपीज
X
शारदीय नवरात्र उत्सव 2025 ला कालपासून प्रारंभ झाला आहे. अनेक महिला यानिमित्ताने उपवास करत असतात. नवरात्रीच्या उपवासाला बहुतांशी फळं, खजूर, अशा गोष्टी खाण्याला प्राधान्य दिले जाते. तर काहीजण नेहमीप्रमाणे खिचडी किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन नवरात्र करतात. मात्र वारंवार गोड पदार्थ किंवा फळ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर आम्ही आजच्या लेखामध्ये काही उपवासाचे असे मस्त पदार्थ सांगणार आहोत त्यामुळे नक्कीच तुमच्या तोंडाला चव येईल.
1)उपवासाचा मोरधन ढोकळा
साहित्य
मोरधन (सामा तांदूळ / वरई) – १ कपसाबुदाणा ¼ कप (पर्यायी)
दही ½ कप (आवडीनुसार आंबट)
पाणी गरजेनुसार (बॅटरसाठी)
हिरव्या मिरच्या१-२ (बारीक वाटून)आलं १ चमचा (वाटून),सेंधव मीठ चवीनुसार,साखर ½ चमचा (पर्यायी),लिंबाचा रस १ चमचा,इनो / फ्रूट सॉल्ट १ चमचा
तेल १ चमचा,जिरं ½ चमचा,हिरवी मिरची १-२,(चिरून) कडीपत्ता काही पाने, चिमूटभर
कृती
मोरधन व साबुदाणा स्वच्छ धुऊन, अर्धा तास भिजत ठेवा.भिजवलेले मोरधन + साबुदाणा मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून थोडं थोडं वाटून घ्या (पूर्ण पातळ नको). यात दही, आलं-मिरची पेस्ट, लिंबाचा रस, साखर व सेंधव मीठ घालून नीट मिसळा.हे बॅटर झाकून १ तास झारत ठेवा (फेरमेंट होईल, पण लगेचही वापरू शकता).इडली साचा किंवा ढोकळा प्लेट ग्रीस करून घ्या.बॅटरमध्ये शेवटी इनो घाला आणि लगेच नीट फसफसल्यावर साच्यात ओता.आधीच गरम करून ठेवलेल्या स्टीमरमध्ये १५–२० मिनिटं वाफवून घ्या.टूथपिकने तपासा,स्वच्छ बाहेर आली तर ढोकळा तयार आहे.
फोडणी
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरं, हिरवी मिरची, कडीपत्ता, हिंग घाला. तयार ढोकळ्यावर ही फोडणी पसरवा.थंड झाल्यावर तुकडे करून नारळ-कोथिंबीर घालून सजवा (उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर).
2)बटाटा चीज बॉल्स (उपवास स्टाइल)
साहित्य
२ उकडलेले बटाटे,२ टेबलस्पून राजगिऱ्याचं पीठ / सिंघाड्याचं पीठ,शेंगदाण्याचं कूट,सैंधव मीठ, मिरची,चीजचे छोटे क्यूब्ज,तळण्यासाठी तूप
कृती:
बटाटा, पीठ, शेंगदाणं, मीठ, मिरची एकत्र करून मळून घ्या. त्यात छोटा गोळा घेऊन मध्ये चीज ठेवून बंद करा.गरम तुपात तळून घ्या. कुरकुरीत आणि चिजी बॉल्स तयार!
3)उपवासाचे राजगिऱ्याचे स्टफ्ड पराठे
साहित्य
राजगिऱ्याचं पीठ,सारणासाठी: किसलेला बटाटा, मिरची, शेंगदाणं, मीठ,तूप
कृती
पीठ भिजवून छोटे गोळे तयार करा. सारण भरून हलक्या हाताने लाटून पराठ्यासारखा भाजा.दही किंवा लोणच्याबरोबर मस्त लागतो!