Home > News > फराह खान पाकिस्तानला चुना लावून फरार?

फराह खान पाकिस्तानला चुना लावून फरार?

फराह खान पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबीची जवळची मैत्रिण आहे. तिच्यावर सहा अब्ज पाकिस्तानी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. फराह खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती फ्लाइटमध्ये बसलेली दिसत आहे.

फराह खान पाकिस्तानला चुना लावून फरार?
X

पाकिस्तानमध्ये राजकीय उलथापालथ सुरूच आहे. याच दरम्यान आता, इम्रान खानची पत्नी बुशरा बीबी हिच्या एका जवळच्या मैत्रिणीने देश सोडल्याची बातमी समोर आली आहे. फराह खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती फ्लाइटमध्ये बसलेली दिसत आहे. मात्र याबाबतच कोणतंही अधिकृत वृत्त देण्यात आलेले नाही.

फराह खान सुमारे ९० हजार डॉलर घेऊन पळून गेली

पाकिस्तानमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यास तिला अटक केली जाऊ शकते. त्यामुळे बुशरा बीबीची जवळची मैत्रीण फराह खान दुबईला पळून गेल्याचे समजते आहे. विशेष म्हणजे ती जवळपास 90 हजार डॉलर्स घेऊन पळून गेली आहे. प्रत्यक्षात व्हायरल झालेल्या फोटोमध्ये जी बॅग दिसत आहे, त्याची किंमत 90 हजार डॉलर असल्याचे सुद्धा सांगण्यात येत आहे. अशी बातम्या अनेक माध्यमांनी दिल्या आहेत.

विरोधकांनी घोटाळ्याचे आरोप केले आहेत

जिओ न्यूजनुसार, पीएमएल-एन नेते आणि माजी अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी सांगितले की, फराहने पंजाब प्रांतातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि त्यांना हव्या त्या ठिकाणी पोस्टिंग मिळवून देण्यासाठी मोठी रक्कम उकळली आहे. हा सहा अब्ज पाकिस्तानी रुपयांचा मोठा घोटाळा असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) च्या उपाध्यक्षा आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांनी दावा केला आहे की फराहने इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीच्या सांगण्यावरून हा भ्रष्टाचार केला आहे.

Updated : 6 April 2022 3:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top