Home > News > प्रसिद्ध गायक केके यांचे कोलकाता येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान स्टेजवरच...

प्रसिद्ध गायक केके यांचे कोलकाता येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान स्टेजवरच...

प्रसिद्ध गायक केके यांचे कोलकाता येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान स्टेजवरच...
X

बॉलीवूड गायक केके (कृष्ण कुमार कुननाथ) यांचे आज मंगळवारी कोलकाता येथे लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 53 वर्षीय केके कोलकाता येथे एका कार्यक्रमात परफॉर्म करत होते. त्याचवेळी मंचावरच त्यांची प्रकृती खालावली आणि ते बेशुद्ध होऊन मंचावरच पडले. ही घटना सायंकाळी उशिरा ७ वाजता घडली. रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण डॉक्टरांनी अद्याप दिलेले नाही. पोस्टमॉर्टमनंतरच त्याची माहिती समोर येईल.

Updated : 31 May 2022 6:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top