Home > News > #RahulBajaj: राहुल बजाज यांचं निधन

#RahulBajaj: राहुल बजाज यांचं निधन

#RahulBajaj: राहुल बजाज यांचं निधन
X

देशाच्या उद्योग क्षेत्राच्या प्रगतीमध्ये योगदान देणारे प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन झाले आहे. शनिवार दुपारी त्यांचे पुण्यात निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बजाज उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठे करण्यात राहुल बजाज यांचा सिंहाचा वाटा होता. हमारा बजाज म्हणत राहुल बजाज यांनी मध्यमवर्गाला परवडतील अशी ट्वू व्हीलर वाहनांची निर्मिती केली. त्यांच्या निधनानंतर दिग्गजांनी त्यांना आदरांजली वाहिली.

महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राहुल बजाज यांना आदरांजली वाहिली आहे. "सुप्रसिद्ध उद्योजक पद्मभूषण राहुल बजाज यांचे आज दुःखद निधन झाले आहे. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बजाज उद्योग समुहाचे अध्यक्ष असलेल्या राहुल बजाज यांनी गेल्या पन्नास वर्षात बजाज उद्योग समूहाला नावारूपाला आणले."

"भारतीय उद्योग जगतातील दिग्गज राहुल बजाजजी यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. उद्योग जगताचा आवाज, सत्तेत असलेल्या इंदिराजी असोत किंवा मोदीजी असोत, त्यांच्याशी लढायला ते कधीच घाबरले नाहीत. औरंगाबाद आणि पुण्याच्या विकासात त्यांचे योगदान मोठे आहे. द्रष्ट्याला वंदन." या शब्दात माजी शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी आदरांजली वाहिली आहे.

तर माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सुद्धा ट्विट करुन राहुल बजाज यांना आदरांजली वाहिली आहे. "राहुल बजाज यांचे निधन हे देशाचे मोठे नुकसान आहे. त्यांनी टू व्हीलर्सचा एक ब्रँड तयार केला आणि राज्यसभेतही प्रभावीपणे काम केले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो" अलसे म्हटले आहे.

माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनीही आदरांजली वाहिली आहे, lअसे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Updated : 12 Feb 2022 12:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top