Home > News > Fact Check: पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या नावाने ट्विटरवर फेक अकाऊंट

Fact Check: पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या नावाने ट्विटरवर फेक अकाऊंट

Fact Check: पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या नावाने ट्विटरवर फेक अकाऊंट
X

मुंबई: सोशल मिडियावर गेल्या काही दिवसांपासून चर्चेतील आणि महत्वाच्या व्यक्तींच्या नावे फेक अकाऊंट बनवण्याचे प्रकार वाढले आहे. त्यातच आता अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या नावाने खोडसाळपणाने कुणीतरी फेक अकाऊंट तयार केले असून, त्यावरून 'जय श्री राम' सारखे घोषणा देण्यात येत आहे.

हे अकाऊंट जानेवारी २०२१ मध्ये बनवण्यात आले असून, गेल्या आठवड्याभरापासून मात्र मोठ्याप्रमाणात सक्रीय झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या अकाऊंटवरून वादग्रस्त अशा पोस्टला रीट्विट करण्यात आले आहे. तसेच या अकाऊंटवरून आज आरती सिंह यांचा वाढदिवस असल्याची पोस्ट सुद्धा करण्यात आली आहे. मात्र हे अकाऊंट फेक असल्याची माहिती पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिली आहे.
आरती सिंह यांनी मॅक्स महाराष्ट्रसोबत बोलताना सांगितले की, 'आज माझा वाढदिवस नाही, कोणीतरी माझे एक बनावट अकाऊंट तयार केले असून, त्यावरून बनावट संदेश पोस्ट करण्यात येत असल्याचं, आरती सिंह म्हणाल्या, त्यामुळे ट्विटरवरील हे अकाऊंट फेक असल्याचं स्पष्ट होत आहे.

Updated : 7 July 2021 1:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top