Home > News > काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या शरयु च फेक अकाउंट

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या शरयु च फेक अकाउंट

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या शरयु च फेक अकाउंट
X

आपण सोशल मीडिया वरती अनेक फेक अकाउंट असलेले निदर्शनास आले असतील, कोणी सुपरस्टार च्या नावाने तर कोणी राजकीय नेत्यांचं नावाने हे अकाउंट काढत फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असतात. यातून फसवणूक करत अनेकांना गंडा घालण्याचा प्रयत्न देखील होत असतो. असाच एक प्रकार काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मुलीच्या बाबतीत घडला आहे.


बाळासाहेब थोरात यांची मुलगी शरयु देशमुख यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीने ट्विटर आयडी वापरत sharayu deshmukh अकाउंट उघडेले आहे. या संदर्भात माहिती मिळताच ट्विटर वरून शरयु देशमुख या काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या आहेत, मात्र त्यांचे ट्विटर वर कोणतेही अकाउंट नाही. त्यांच्या नावाने ट्विटर अकाउंट सुरु करून खोडसाळपणा केला जात आहे. यासंदर्भात सायबर पोलिसांकडे तक्रारही करण्यात आलेली आहे. अस ट्विट करण्यात आले आहे.


तर नोंद घ्यावी..! शरयू देशमुख यांच्या नावाने असलेले ट्विटर अकाऊंट खोटे (Fake) आहे. म्हणत रिट्विट करत @MahaCyber1 ला टॅग करत तक्रार नोंदवली आहे.


हे ट्विटर अकाऊंट फेक आहे. असे कोणतेही ट्विटर अकाऊंट शरयू देशमुख वापरत नाही अशी पोस्ट त्यांनी केली आहे

Updated : 26 July 2022 3:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top