Home > News > Facebook, WhatsApp, Instagram चे नाव आता Meta असे होणार का?

Facebook, WhatsApp, Instagram चे नाव आता Meta असे होणार का?

Facebook, WhatsApp, Instagram चे नाव आता Meta असे होणार का?
X

जगभरातील सोशल मीडिया युजर्सचे सगळ्यात फेव्हरेट एप असलेल्या फेसबुकच्या पॅरेन्ट कंपनीचे नाव आता बदलले आहे. आता कंपनीने 'Meta' हे नाव धारण केले आहे. फेसबुकच्या अल्गोरिदमचा मुद्दा सध्या वादात अडकला असताना कंपनीने आपले ब्रँडिंग करण्याचे ठरवले आहे आणि यामध्ये सगळ्यात पहिला बदल हा कंपनीच्या नावात करण्यात आला आहे. या निर्णयाबाबत माहिती देताना कंपनीचे मालक

Mark Zuckerberg यांनी कंपनीच्या भविष्यातील वाटचालीबाबत माहिती दिली. आभासी जगाच्या क्षेत्रात एक मोठे परिवर्तन करण्याच्या दृष्टीने कंपनीतर्फे आता 'metaverse' तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून कंपनीने आपले ब्रँडिंग आता Meta नावाने करण्याचे ठरवले आहे.

कंपनीच्या या निर्णयामुळे Facebook, Instagram आणि WhatsAppच्या जगभरातील कोट्यवधी वापरकर्त्यांच्या मनात निर्माण झालेली शंका म्हणजे या एप्सचे नाव बदलले जाणार आहे का, पण कंपनीने या एप्सची नावे कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, फक्त आता पॅरेन्ट कंपनी Facebook ऐवजी Meta हे नाव असेल. मार्क झुकरबर्ग यांनी कंपनीच्या वार्षिक बैठकीत याबद्दल माहिती दिली. "गेल्या दिवसात निर्माण झालेल्या सामाजिक विषयांवरील वादावरुन आपण खूप काही शिकलो आहोत, यामधून शिकून आपण पुढे गेले पाहिजे आणि नव्या अध्यायाची सुरूवात केली पाहिजे" असे त्यांनी सांगितले. कंपनीचे नाव Meta असले तरी आपल्या विविध एप्स आणि ब्रँड्सच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणण्याचे काम आपण कायम करत राहणार आहोत, असेही झुकरबर्ग यांनी स्पष्ट केले आहे. फेसबुकच्या अल्गोरिदममुळे लोकशाही धोक्यात येत असून खोटी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप कंपनीवर गेल्या दिवसात झाला होता. त्यामुळे फेसबुकचे मोठे नुकसान देखील झाले होते.

Updated : 2021-10-29T17:54:39+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top