Latest News
Home > News > फेसबुक व्हाट्सअप आणि इंस्टाग्राम का बंद पडलं?

फेसबुक व्हाट्सअप आणि इंस्टाग्राम का बंद पडलं?

काही वेळापूर्वी फेसबुक व्हाट्सअप आणि इंस्टाग्राम हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पूर्णपणे ठप्प झाले आहेत. अचानक अशाप्रकारे हे ठप्प झाल्यामुळे अनेक वापरकर्त्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय.

फेसबुक व्हाट्सअप आणि इंस्टाग्राम का बंद पडलं?
X

फेसबुक व्हाट्सअप आणि इंस्टाग्राम हे जगभरात अनेक ठिकाणी ठप्प झाले आहेत. खरतर लाखो वापरकर्ते दररोज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत असतात. अचानकच आज काही वेळा पूर्वी व्हाट्सएप, इंस्टाग्राम आणि फेसबूक हे ठप्प झाल्यामुळे अनेकांना अडचणीचा सामना करावा लागतोय. अशाप्रकारे अचानक हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ठप्प का झाले? याबाबत अद्यापही कुठलीही माहिती समोर आलेली नाही. मात्र फेसबुक ते आपल्या वेबसाईट मेसेजवर यासंदर्भात दिलगिरी व्यक्त केली आहे त्यामुळे त्यांनी 'काहीतरी चुकीचं झाला आहे. माफ करा. आम्ही गुंता सोडवण्याचे काम करत आहोत आणि लवकरच हे सर्व सुरळीत होईल असं म्हटलं आहे.


Updated : 2021-10-05T09:20:42+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top