Home > News > सुटकेसमध्ये मानवी शरीराचे तुकडे सापडल्याने खळबळ, नेरळमधील घटना

सुटकेसमध्ये मानवी शरीराचे तुकडे सापडल्याने खळबळ, नेरळमधील घटना

सुटकेसमध्ये  मानवी शरीराचे तुकडे सापडल्याने खळबळ,  नेरळमधील घटना
X

नेरळ येथे मृतदेहाचे तुकडे सापडल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. मानवी शरीराचे तुकडे करून दोन सुटकेसमध्ये भरण्यात आले असून शरीराचे काही भाग आणि डोके घटनास्थळी सापडले नाहीत. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी डॉक्टराना पाचारण करण्यात आले. मृतदेहावरून एका 40 वर्ष वयोगट असलेल्या पुरुषाचा देह असून दोन दिवसापूर्वी या व्यक्तीला मारून टाकण्यात आले असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरने व्यक्त केला आहे.

दरम्यान, याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, नेरळ पोलीस आणि कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेर्डीकर अधीक तपास करत आहेत.

Updated : 17 Dec 2020 9:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top