Latest News
Home > News > लसीकरण अभियानाच्या वर्षपुर्तीनिमित्त स्वदेशी कोवॅक्सीन लसीवर नवं पोस्टल तिकीट जारी!

लसीकरण अभियानाच्या वर्षपुर्तीनिमित्त स्वदेशी कोवॅक्सीन लसीवर नवं पोस्टल तिकीट जारी!

सध्या भारतात कोरोनाची तिसरी लाट सुरु आहे. अशात भारत सरकारने सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेला वर्षपुर्ती झाली आहे. या वर्षपुर्तीनिमित्त ICMR आणि भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने एक पोस्ट तिकीट जारी करण्यात आलं आहे.

लसीकरण अभियानाच्या वर्षपुर्तीनिमित्त स्वदेशी कोवॅक्सीन लसीवर नवं पोस्टल तिकीट जारी!
X

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या दहशतीखाली जगभरातले देश आहेत. कोरोनावरील लसीसाठी संपुर्ण जगभरात संशोधन सुरू होतं. अशात भारतातील लस निर्मिती संस्था असलेल्या भारत बायोटेक या कंपनीने लस संशोधन केले. कोरोनावर कोव्हॅक्सीन नावाची लस त्यांनी शोधून काढली. मागील वर्षी आजच्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2021 पासून देशभरामध्ये लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली होती. तेव्हा देशाला कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमुळे दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला होता.

सध्या भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे तिसरी लाट पसरली आहे. पुन्हा एकदा मागील वर्षासारखीच परिस्थिती उद्भवलेली असताना देशातील लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण होत आहे. याच वर्षपूर्तीनिमित्त इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने कोवॅक्सीन लसीवर एक पोस्टल तिकीट जारी करण्यात आले आहे. अशी माहिती PIB या भारतीय वृत्तसंस्थेने ट्विट करून दिली आहे.

"लसीकरण मोहिमेला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने #ICMR आणि भारत बायोटेक यांनी विकसित केलेल्या स्वदेशी कोवॅक्सीनवरील टपाल तिकीट आज जारी करण्यात आले." असं ट्विट त्यांनी केलं आहे.

Updated : 16 Jan 2022 1:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top