Home > Political > भारती लव्हेकर यांनी व्यक्त केलेली खंत तालिका उपाध्यक्षांनी केली दूर

भारती लव्हेकर यांनी व्यक्त केलेली खंत तालिका उपाध्यक्षांनी केली दूर

भारती लव्हेकर यांनी व्यक्त केलेली खंत तालिका उपाध्यक्षांनी केली दूर
X

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेचं पार पडले. या अधिवेशनात अनेक मुद्दे चर्चेला आले आणि या सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा प्रकर्षाने #MaxWoman ने समोर आणला तो म्हणजे महिला आमदारांना बोलण्यासाठी मिळणारा अपुरा वेळ. हाच प्रश्न आमदार डॉ. भरती लव्हेकर यांनी देखील अनेक वेळा विधिमंडळात उपस्थित केला. त्यानंतर त्यांनी #MaxWoman शी बोलताना महिलांना संधी ही प्रत्येक गोष्टीत मिळवून द्यावी लागते आणि ती विधिमंडळात देखील मिळवून घेतल्याची समाधानकारक भावना व्यक्त केली.

महिलांना संधी ही प्रत्येक गोष्टी मध्ये मिळवून द्यावी लागते. विधिमंडळात बोलण्याची संधी मिळत नव्हती मात्र आम्ही बऱ्याच वेळा रात्रीपर्यंत बसलो आणि उपाध्यक्षांना भेटलो आणि त्यानंतर ती संधी आम्ही मिळाली. महिलांचे बरेच असे प्रश्न असतात जे फक्त महिला आमदार मांडू शकतात. आमदार म्हणून या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ते प्रश्न या माध्यमातून पुढे यावे यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न असल्याचं लव्हेकर यांनी मॅक्सवुमनशी बोलताना सगीलते.

महिला आमदार म्हणून महिलांचे आरोग्य, महिला सक्षमीकरण, महिलांसाठी मिळणारे पाणी यासारख्या मूलभूत गरजांवर एक आई म्हणून, एक बहीण म्हणून ज्या गजरा पहिला लक्षात येतात त्याकडे माझं पहिला लक्ष जातं. त्यामुळे महिला आमदार म्हणून विकासाच्या कामाबरोबर या गोष्टींना आम्ही प्राधान्या देत असल्याचे त्या म्हणाल्या..त्यानी काय भावना व्यक्त केल्या पहा..


Updated : 26 March 2022 12:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top