'वय हि फक्त एक संख्या '... ९४ वर्षीय आजींची कमाल ...फिनलंडमध्ये फडकवला तिरंगा.
X
वयाच्या ९४ व्या वर्षीसुद्धा आपल्या देशाचं स्थान परदेशात अव्व्लल ठरवणाऱ्या भगवान देवी डागर(Bhgavan devi dagar ) या आजींच्या धाडसाला दाद दिली पाहिजे. या वयात 100 मीटर स्प्रिंट स्पर्धेत सुवर्ण पदक कमावलं आहे .त्यांनी 24.74 सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले .आणि गोळाफेकमद्ये कांस्यपदक जिंकले आहे
ज्या वयात माणसाला नीट बसता उठता हि येत नाही त्या वयात भारताचे नाव एका ९४ वर्षाच्या आजींनी परदेशात गाजवलं आहे.भगवान देवी डागर असं या ९४ वर्षीय चॅम्पियनचं नाव आहे. फिनलंडमध्ये झालेल्या वर्ल्ड मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022 मध्ये भारतासाठी एक सुवर्ण आणि दोन कांस्यपदके जिंकली. भगवान देवी यांनी ज्येष्ठ नागरिक गटात 100 मीटर स्प्रिंट स्पर्धेत सुवर्ण आणि त्यानंतर शॉटपुटमध्ये कांस्यपदक जिंकले.यामध्ये 24.74 सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकल आहे.
भारत दरवर्षी स्वतःची राष्ट्रीय मास्टर्सॲथलेटिक्स चॅम्पियनशिप आयोजित करतो. सर्व वयोगटातील लोकांसाठी त्यांच्या संबंधित राज्यांच्या वतीने स्पर्धा करण्यासाठी अनेक ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट्स आहेत आणि या स्पर्धेतील विजेते परदेशी स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतात. यापूर्वी त्यांनी दिल्ली राज्य ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये १०० मीटर, शॉट पुट आणि भालाफेक स्पर्धेत तीन सुवर्णपदके जिंकली होती. यामुळे त्या राज्यस्तरीय पदक विजेती असल्याने राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यास पात्र ठरल्या होत्या.
त्याचबरोबर 90 वर्षाच्या असताना त्यांनी चेन्नईतील राष्ट्रीय मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णपदके जिंकली आहेत. या कार्यक्रमात 26 राज्यांतील सुमारे 3500 क्रीडापटू 13 विविध वयोगटांमध्ये भाग घेतात.यानंतर त्या फिनलंडमध्ये होणाऱ्या जागतिक मास्टर्स अथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पात्र ठरल्या होत्या .या स्पर्धेत त्यांनी अनमोल यश संपादन करत पुन्हा एकदा 'वय हि फक्त एक संख्या आहे ',हे दाखवून दिल आहे.भगवान देवी डागर या हरियाणातील खिडका गावातील आहेत. त्यांचा नातू विकास डागर हा आंतरराष्ट्रीय पॅरा ॲथलीट आहे.