Home > News > एकनाथ शिंदेंची खेळी, शिंदे गटाच्या लोकसभेच्या प्रतोद भावना गवळी?

एकनाथ शिंदेंची खेळी, शिंदे गटाच्या लोकसभेच्या प्रतोद भावना गवळी?

एकनाथ शिंदेंची खेळी, शिंदे गटाच्या लोकसभेच्या प्रतोद भावना गवळी?
X

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेतील आमदारांपाठोपाठ खासदारही एकनाथ शिंदे (Cm Eknath shinde) यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. दरम्यान एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. काल शिवसेना नेते संय राऊत यांनी बैठक बोलावली होती या बैठकीला एकूण ५ खासदार उपस्थित होते. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील ऑनलाईल बैठक घेतली या बैठकीला १२ खासदार उपस्थित असल्याच वृत्त आहे. दरम्यान यावेळी शिंदे गटातील शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे तर प्रतोदपदी भावना गवळी यांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेने भावना गवळी यांची लोकसभेच्या प्रतोद पदावरून हकालपट्टी केली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांची शिंदे गटाच्या प्रतोद म्हणून निवड करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या 12 खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची दाट शक्यता आहे. या भेटीनंतर या बंडखोर खासदारांचा वेगळा गट लोकसभेत होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतच्या भेटीत राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार, ओबीसी आरक्षण, सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांच्या दाव्यामुळे ठाकरे सेना गॅसवर गेली असल्याचे म्हटले जात आहे. तर एकनाथ शिंदे यांनी बंडानंतर आमदारांपाठोपाठ नगरसेवक व सामान्य शिवसैनिकांचा पाठींबा मिळवण्यावर लक्ष केंद्रीत केले होते. त्यानंतर शिवसेनेच्या खासदार भावना गवळी(Bhavana gavali) यांनी भाजपला पाठींबा देण्याची मागणी उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे केली होती. त्यापाठोपाठ शिवसेनेचे आनंदराव आडसूळ, राहूल शेवाळे (Rahul shewale), राजेंद्र गावित यांनीही भाजपला पाठींबा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (draupadi murmu) यांना पाठींबा दिला होता. मात्र त्यानंतरही शिवसेनेच्या खासदारांनी शिंदे यांच्या ऑनलाईन बैठकीला हजेरी लावल्याचे वृत्त आहे. तर शिवसेनेच्या 12 नाही तर 18 खासदारांचा पाठींबा असल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

Updated : 19 July 2022 4:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top