मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
X
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 बर्मिंगहॅम मध्ये सुरू आहेत .या स्पर्धेत मीराबाई चानू हिने सुवर्ण पदक जिंकून भारताच्या नावावर अजून एक विक्रम नोंदवला आहे . बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकत सांगलीतील संकेत सरसागर यांने विजयाची सुरुवात केली होती
वेट लिफ्टर संकेत सरगर याला सरकारकडून तीस लाखांचे पारितोषिक मिळणार आहे ,असे ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे ."बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रोप्य पदक विजेती कामगिरी करणाऱ्या सांगली येथील संकेत सरगर या वेटलिफ्टरला सरकारकडून ३० लाखांचे पारितोषिक .त्याच्या मार्गदर्शकांनाही साडेसात लाखांची पारितोषिक देण्याची घोषणा"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे
बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सांगली येथील संकेत सरगर या वेटलिफ्टरला सरकारकडून तीस लाखांचे पारितोषिक.. त्याच्या मार्गदर्शकांनाही साडेसात लाखांचे पारितोषिक देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 31, 2022