- जळगावच्या तरुणाने एल्ब्रुसवर फडकविला तिरंगा..
- मुलींनी घातलेला ड्रेस 'सेक्सी' आहे कि नाही हे कोण ठरवणार ?
- गावाला जोडणारा मुख्य रस्ता नसल्याने सहन कराव्या लागतायत मरण यातना..
- Vinayak Mete : ''कदाचित याचा मास्टर माइंड एकच असू शकतो..'' दीपाली सय्यद यांची चौकशीची मागणी
- देशभक्तीपर गाणी म्हणत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी साजरा केला स्वातंत्र्य दिन..
- या गावात विधवांच्या हस्ते ध्वजारोहण
- पंतप्रधानांनी भाषणात उल्लेख केलेल्या बेगम हजरत महाल कोण आहेत?
- महिलांना सन्मान मिळत नसल्याने मोदींनी व्यक्त केला खेद..
- रात्री सव्वा दोन वाजता विनायक मेटे यांचा देवेंद्र फडणवीसांना मेसेज
- स्वाती काळे या महिला पोलीस रणरागिणीचा होणार सन्मान..

सत्तेत असताना भाजपने रस्त्याला 'टिपू सुलतान' नाव देण्यास पाठिंबा दिला होता; पेडणेकरांकडून पोलखोल
X
मुंबई: गोवंडी येथील उद्यानास टिपू सुलतान उद्यान नाव देण्यास भाजपने विरोध दर्शविला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव रद्द करण्याची मागणी भाजपने (bjp) केली आहे. तसेच उद्यानास 'टिपु सुलतान उद्यान' असे नाव देण्यास शिवसेनेचा छुपा पाठिंबा आहे का असा सवाल देखील भाजपकडून उपस्थित केला गेला होता. त्यांनतर आता शिवसेनच्या नेत्या आणि महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी भाजपच्या पाठींब्याच जून पत्र दाखवत पोलखोल केली आहे.
एम /पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १३६ च्या नगरसेविकेने महापालिकेच्या उद्यानास 'टिपु सुलतान उद्यान' असे नांव देण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे. त्याला भाजपने विरोध केला आहे. तसेच यासाठी शिवसेना छुपा पाठिंबा देत असल्याचा आरोप सुद्धा केला होता. मात्र भाजपने केलेल्या आरोपावर महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी उत्तर देत, प्रत्यक्षात 2013 मध्ये सत्तेत असताना भाजपने गोवंडीतील एका रस्त्याला 'टिपू सुलतान' नाव देण्यास पाठिंबा दिला होता, असा दावा करीत त्यावेळी स्थापत्य समितीत मंजुरीसाठी मांडलेल्या, भाजपचा पाठिंबा असलेल्या प्रस्तावाची प्रतच समोर आणली आहे.
त्यामुळे शिवसेनेवर आरोप करणारी भाजप पेडणेकरांच्या 'लेटर बॉम्ब'मुळे अडचणीत आली आहे. तर शिवसेनेला बदनाम करण्यासाठी या प्रकरणाला राजकीय आणि धार्मिक रंग भाजप देत आहे. भाजपच्याच पाठिंब्याने मुंबईत या आधीही काही ठिकाणी 'टिपू सुलतान' नाव देण्यात आले असल्याचा आरोप किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी केला आहे.