Home > News > चेंबूरमध्ये भिंत कोसळून 17 जणांचा मृत्यू, वर्षा गायकवाडांनी घटनास्थळी जाऊन केली पाहणी

चेंबूरमध्ये भिंत कोसळून 17 जणांचा मृत्यू, वर्षा गायकवाडांनी घटनास्थळी जाऊन केली पाहणी

चेंबूरमध्ये भिंत कोसळून 17 जणांचा मृत्यू, वर्षा गायकवाडांनी घटनास्थळी जाऊन केली पाहणी
X

मुंबईत शनिवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे चेंबुरमधील भारतनगरमध्ये सुरक्षा भिंत काही झोपड्यांवर कोसळली आहे. यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखाली आणखीही काही जण अडकले असण्याची भीती व्यक्त होते आहे. या दुर्घटनेनंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी एनडीआरएफचे जवान, अग्निशमन दलाचे जवान तसेच इतर स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांशी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्यात की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याप्रकरणी लक्ष घालून नागरिकांना तात्काळ मदत करण्याची विनंती करणार आहे. तसेच ज्या नागरिकांची घरे बाधित झाली आहेत व ज्यांची घरे राहण्यायोग्य नाहीत अशा नागरिकांच्या स्थलांतराबाबत जिल्हाधिकारी उपनगर यांच्याकडे चर्चा केली असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्यात.






मुंबईत शनिवारपासून सुरू असलेल्या पावसात चेंबुर आणि विक्रोळ इथे झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 23 झाली आहे. या दुर्घटनेची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर कऱण्यात आली आहे. तसेच जखमी झालेल्या 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर मोफत उपचार केले जातील, असं जाहीर केलं आहे.

Updated : 18 July 2021 9:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top