Home > News > ED ची मोठी कारवाई; IAS अधिकाऱ्याच्या घरी सापडली मोठी रोकड

ED ची मोठी कारवाई; IAS अधिकाऱ्याच्या घरी सापडली मोठी रोकड

ED ची मोठी कारवाई; IAS अधिकाऱ्याच्या घरी सापडली मोठी रोकड
X

झारखंडच्या वरिष्ठ आयएएस अधिकारी पूजा सिंघल व त्यांच्या संबंधित आणाऱ्या 20 लोकांच्या ठिकाणांवर सक्तवसुली संचलनालयाने (ED) छापे टाकले आहेत. आता या छाप्यानंतर जे काही समोर आला आहे त्यामुळे तुम्ही सर्वजण थक्क व्हाल. पूजा सिंघल यांच्याशी संबंधित लोकांकडून जवळपास 19 कोटींची रोकड जप्त केली आहे. ज्यावेळी ED ने त्यांच्यावर छापे टाकले त्यावेळी त्यांच्याकडून मोठी रोकड जप्त करण्यात आली आहे. जी रक्कम जप्त करण्यात आली आहे त्या बाबत ED ने अद्याप कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही आहे.

अनेक माध्यमात छापून आलेल्या माहितीनुसार, पूजा सिंघल यांच्या घरातून अनेक महत्त्वाची कागदपत्रे देखील मिळाली आहेत. त्याचोबत ED ने एका रुग्णालयावर देखील छापा टाकला आहे. हे रुग्णालय पूजा सिंघल यांचे पती व्यवसायिक अभिषेक झा यांचे आहे.
पूजा सिंघल नक्की कोण आहेत?

पूजा सिंगल या झारखंडच्या एक वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांच्याकडे सध्या उद्योग सचिव आणि खान सचिव पदाचा प्रभार आहे.

Updated : 7 May 2022 7:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top