Home > News > लोकल ट्रेनच्या महिला फर्स्ट क्लास डब्यातून दारुड्याचा झोपून प्रवास

लोकल ट्रेनच्या महिला फर्स्ट क्लास डब्यातून दारुड्याचा झोपून प्रवास

लोकल ट्रेनच्या महिला फर्स्ट क्लास डब्यातून दारुड्याचा झोपून प्रवास
X

कर्जत लोकल ट्रेनमध्ये घाटकोपर ते कल्याण रेल्वे स्थानका दरम्यान महिला प्रवाशांच्या फर्स्ट क्लास डब्यात एका दारुड्याने झोपून प्रवास केल्याची धक्कादायक भाऊबीजेच्या दिवशी घडली आहे. हा दारुड्या महिलांच्या डब्यात झोपलेला आढळला आणि एका महिला प्रवाशाने रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. ही माहिती मिळताच डोंबिवली रेल्वे स्थानकात रेल्वे पोलीस महिला डब्यात चढले. त्यांनी त्या दारुड्याला कल्याण स्थानकात उतरवून त्याच्या वर अवैधरीत्या महिला डब्यात प्रवास करण्याचा गुन्हा दाखल केला. मात्र महिलांच्या डब्यातून दारुड्याने प्रवास केल्याने महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Updated : 7 Nov 2021 12:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top