Home > News > उच्च न्यायालयात न्यायाधीश होणार डॉ. नीला गोखले...| #maxwoman

उच्च न्यायालयात न्यायाधीश होणार डॉ. नीला गोखले...| #maxwoman

उच्च न्यायालयात न्यायाधीश होणार डॉ. नीला गोखले...| #maxwoman
X


देशातीच्या सर्वोच्च न्यायालयात वकीली करणाऱ्या व मूळच्या पुणेकर असलेल्या डॉ. नीली केदार गोखले यांना मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी बढती देण्यात येणार आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने शिफारस केली आहे. पुण्याच्या विधी महाविद्यालयातून लॉ चे शिक्षण पूर्ण केलेल्या गोखले यांनी न्यायाधीशपदी नियुक्ती होत आहे. पुणेकरांसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.

नीला गोखले यांचे प्राथमिक शिक्षण हे पुण्यातील पाषण भागात असलेल्या सेंट जोसेफ हायस्कूल येथे झाले आहे. तर त्यांनी बीएमसीसी कॉलेजमधून १९८९ मध्ये बॉ. कॉम. ची पदवी संपादन केली. तर १९९२ मध्ये इंडियन लॉ सोसायटी विधी महाविद्यालयातून गोखले यांनी एल.एल.बी. ही पदवी संपादन केली आणि त्यानंतर पुणे विद्यापीठातून १९९५-१९९९७ दरम्यान एल.एल.एम चे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. गोखले यांनी त्यानंतर झाशीच्या बुंदेलखंड विद्य़ापीठातून दत्तक घेण्याच्या सामान्य कायद्याकडे या विषयावर पी.एच.डी. मिळवली. त्यांचे पती कर्नल केदार गोखले हे लष्करी क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना प्रीती, प्रिया आणि ईशान ही तिन्ही मुले विधीचे शिक्षण घेत आहेत.

नीला गोखले यांनी अनेक वर्ष देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दत्तक घेण्याच्या क्षेत्रात काम केले आहे. तसेच कुसुमबाई मोतीचंद महिला सेवा ग्राम सारख्या संस्थांना निशुल्क सेवा दिल्या आहेत. गोखले यांनी ७ वर्ष कौटुंबिक न्यायालये व इतर प्राधिकरणांसह पुणे जिल्हा न्यायालयांमध्ये प्रॅक्टिस केली आहे. २००७ पासून त्या नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत. गोखले यांनी सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयात दिवाणी आणि फौजदारी आणि घटनात्मक स्वरुपाच्या प्रकरणांमध्ये काम केले आहे. सध्या गोखले या नवी दिल्ली येथील आयएलआय विद्यापीठातील व्हिजिटिंग फॅकल्टीच्या सदस्य आहे.

Updated : 16 Jan 2023 1:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top