Home > News > नाईट फॉल म्हणजेच स्वप्नदोष रात्रीचे हार्मोन्स घडवुन आणतात का?

नाईट फॉल म्हणजेच स्वप्नदोष रात्रीचे हार्मोन्स घडवुन आणतात का?

स्वप्नदोषाचा प्रकार सारखा घडतोय... पण नेमकं स्वप्नदोष म्हणजे काय? ते रात्रीच का घडतं? रात्रीचे हार्मोन्स याला कारणीभूत ठरतायत का? जर हो तर मग हे हार्मोन्स आणखी काय काय करतात? आपल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील ती जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख...

नाईट फॉल म्हणजेच स्वप्नदोष रात्रीचे हार्मोन्स घडवुन आणतात का?
X

आपण कधी स्वतःचं निरीक्षण केलंय का की आपली एकाग्रता पातळी सकाळी आणि संध्याकाळी वेगवेगळी असते. ऑफिस किंवा कॉलेजचा एखादा रिपोर्ट तयार करणयासाठी आपण तासन्तास घालवतो पण काम होत नाही. तोच रीपोर्ट कधी कधी एका झटक्यात आपण लिहून काढतो. याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे बॉडीक्लॉक! असं का म्हणतात की पहाटे लवकर उठून योग करा किंवा पहाटे लवकर अभ्यासाला बसा कारण की सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत आपल्या शरीरात तऱ्हेतऱ्हेचे हार्मोन्स तयार होत असतात. कुणी आपल्याला अलर्ट करतं तर कुणी आपल्याला थकवतं. कुणी आपल्याला सांगतं की जागे व्हा..... तर कुणी सांगतं की आता झोपून जा खुप रात्र झालीये. चला तर मग जाणून घेऊयात हे हार्मोन्स आपल्यासोबत काय काय करत असतात.

सुर्यास्त झाल्यानंतर लाल आणि नारंगी रंगाचा प्रकाश आपल्या डोळ्यांमध्ये असलेल्या रेटीनाला अॅक्टिवेट करतो. यामुळे मेलोटॉननचं प्रमाण वाढत जात. मेलोटॉनन हे तेच हार्मोन्स आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला झोप लागते. खरंतर हे हार्मोन्स आपल्याला थकवतात. आपण कोणतंही काम करण्याच्या मनस्थितीत नसतो. आपले डोळे बंद होऊ लागतात. शरीरात हलकी कंपनं जाणवू लागतात ज्यामुळे मेंदूपर्यंत हा संदेश जातो की आता आपल्याला झोपायचं आहे. मेंदुतील हाय फ्रिक्वेन्सी वेव्हची जागा लो फ्रिक्वेन्सी वेव्ह घेतात. आपण पुर्णपणे रिलॅक्स होऊन जातो. आपण झोपल्यानंतर आपलं शरीर एकप्रकारच्या कार्यशाळेत बदलून जातं. म्हणजेच शरीराच्या डागडुजीचं काम त्यावेळी होत असतं. मांसपेशी, केस, हाडं अगदी सगळ्याची व्यवस्थित डागडुजी केली जाते.

आता तरी कळालं का की लहान मुलं आपल्यापेक्षा जास्त का झोपतात. होय हार्मोन्समुळेच!लहान मुलांमध्ये ग्रोथ हार्मोन्स सर्वाधिक सक्रीय असतात. कारण लहान मुलांना मोठं जे व्हायचं असतं. मुल जेव्हा जन्माला येतं तेव्हा तर दिवसभर झोपेतच असतं. मग हळूहळू १६ तासांची झोप आवश्यक असते. त्यानंतर १४ वरून १२ आणि १२ वरून १० तासांवर ही झोप येऊन थांबते. जेव्हा आपण व्यवस्थित झोपत नाही त्यावेळी आपल्या डोळ्यांखाली काळे खड्डे पडतात होना! पण असं का? तर ग्रोथ हार्मोन्सना आपल्या त्वचेची डागडुजी करण्यासाठी पुरेसा कालवधी नाही मिळाला. अशाप्रकारे जर आपण पुरेशी झोप नाही घेतली तर केस गळू लाागतात. आपल्याला फ्रेश वाटत नाही. आपलं शरीर हे एका संगणकासारंखं आहे. स्मार्टफोन, संगणक आपल्याला समजायचं ते समजा हो.. आहेत तर सगळे संगणकच नाही का...आणि आपला मेंदू आपल्या शरीराचा प्रोसेसर आहे. प्रोसेसर फास्ट चालला तर संगणक देखील फास्ट चालतो. जेव्हा आपला कंप्युटर हँग होऊ लागतो, व्यवस्थित चालत नाही तेव्हा आपण तो शटडाउन करतो आणि पुन्हा रिस्टार्ट करतो. आपली झोप जी आहे ती आपल्या शरीराचा शटडाऊन मोड आहे. या शटडाऊन मध्ये आपल्या प्रोसेसरमध्ये नेममकी काय भानगड सुरू असते? चला आता तिला समजुन घेण्याचा प्रयत्न करूयात.

झोपेत मेंदुच्या देखील साफसफाईचं काम सुरू असतं. दिवसभरात आपण जे काही पाहिलं अनुभवलं त्यातील महत्वाच्या गोष्टी तात्पुरत्या साठ्यात पाठवल्या जातात. आणि ज्या गरजेच्या नसतात त्या आठवणी मेंदू नष्ट करतो. फक्त अतिमहत्वाच्या गोष्टींनाच मेंदु कायमस्वरूपी साठ्यात जतन करून ठेवतो. हे सगळं तेव्हा होतं जेव्हा आपण गाढ झोपेत असतो. यानंतर सुरू होतो रॅपिड आय मुव्हमेंट फेस, म्हणजेच आपल्या झोपेचा तो हिस्सा जिथे आपण स्वप्नं पाहतो. यामध्ये आपला रक्तदाब म्हणजेच बीपी वाढतो, हृदयाचे ठोके वाढतात, श्वसनक्रिया जलद गतीने होऊ लागते. स्वप्नांमार्फत मेंदू त्या भावनांना क्रियाशील करतो ज्या आपण दिवसभरात अनुभवल्या आहेत. काही काळ स्वप्न पाहिल्यानंतर आपण पुन्हा गाढ झोपेत जाऊ लागतो. त्यानंतर काही वेळाने आपण स्वप्नं पाहू लागतो. झोपेत असताना आपल्या शरीराचं तापमान ढासळतं म्हणून आपल्याला पांघरुण घेऊन झोपावं लागतं. जे लोक रात्री झोपत नाहीत त्यांचा मेंदू गोंधळलेल्या स्थितीत राहतो. हेच कारण आहे ज्यामुळे रात्रीच्या समयी अपघात देखील जास्त होतात. पहाट होता होता स्ट्रेस हार्मोन कॉर्टीजोल पुन्हा अॅक्टीव्ह होऊ लागतो. आणि आपली झोप मोडूलागते.कॉर्टीजोलच आपल्याला झोपेतून उठवण्याचं काम करतो पण अलार्म म्हणजेच गजर झाल्या झाल्या अंथरूणातून कधीच उठू नये. कारण मेंदूचा प्रत्येत भाग एकत्रच जागत नाही त्यामुळे थोडा वेळ घ्या. प्रत्येक नव्या पहाटेसोबत आपला प्रोसेसर पुन्हा रिस्टार्ट होतो.

मग स्वप्नदोष म्हणजेच नाईट फॉलला देखील हार्मोन्स कारणीभूत आहेत का?

हा त्रास जास्त करून पौगंडावस्थेतील मुलांसोबत पाहिला जातो. कारण ऐन तारूण्यात शरीरात हार्मोन्सचं प्रमाण सर्वाधिक असतं. पाळीसंदर्भातील लेखामध्ये आम्ही आपल्याला सांगितलं होतं की मुलींसोबतही असं होतं त्यांचे हार्मोन्स वर खाली होत असतात, मुलांसोबतही असंच होतं. वैद्यकीय भाषेत याला nocturnal emission अथवा Sleep Orgasm म्हटलं जातं. होतं काय की पुरूषांच्या शरीरात सारखं वीर्याचं उत्पादन होत असतं. स्खलनामार्फत जुनं वीर्य शरीरातून बाहेर काढलं जातं आणि वृषणं नव्या वीर्याचं उत्पादन करायला घेतात. जर वीर्य शरीरातून बाहेर काढलं गेलं नाहीये किंवा गरजेपेक्षा जास्त वीर्याचं उत्पादन होत असेल तर शरीर हे स्वतःहून बाहेर काढतं, पण मग हे रात्रीच्याच वेळेस का होतं? कारण झोपेत मेंदू आपल्या सर्व भावनांना क्रीयाशील करत असतो. जर भावना सेक्ससंदर्भात असतील आणि प्रत्यक्षात तसं काहीच घडत नसेल तर मेंदू त्यांचं रूपांतरण स्वप्नात करतो आणि ही स्वप्नं आपल्या सेक्स हार्मोन्सना ऍक्टीवेट करतात जे लैंगिक ग्रंथींना सुचित करतात की आता जुनं वीर्य बाहेर फेकण्याची वेळ आली आहे. असं जर महिन्यातून दोनदा होत असेल तर नॉर्मल आहे पण जर सारखं होत असेल तर मग काय कराल? तेच जे आम्ही महिलांना मागील लेखात सांगितलं होतं डॉक्टरांचा सल्ला घ्या. कुणाचाही सल्ला ऐकत बसू नका आणि ते भिंतींवर किंवा ट्रेनमध्ये लावलेल्या हकीम बाबांकडे तर अजिबात जाऊ नका कृपया डॉक्टरांकडेच जा. तसंही हार्मोन्स फक्त इतकंच करत नाहीत आणखी बरंच काही करतात ते पुढील लेखात जाणून घेऊयात.

Updated : 18 Jun 2022 2:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top