Home > News > दिशा सॅलियनची बदनामी करणाऱ्या नेत्यांविरोधात आई वडिलांची राष्ट्रपतींकडे धाव

दिशा सॅलियनची बदनामी करणाऱ्या नेत्यांविरोधात आई वडिलांची राष्ट्रपतींकडे धाव

“आमच्या मुलीची बदनामी करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करा अन्यथा आम्ही आत्महत्या करू”, दिशा सॅलियनच्या पालकांची राष्ट्रपतींकडे धाव…

दिशा सॅलियनची बदनामी करणाऱ्या नेत्यांविरोधात आई वडिलांची राष्ट्रपतींकडे धाव
X

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सॅलियनच्या (Disha Salian) आई-वडिलांनी आता थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्याकडे धाव घेतली आहे. मुलीची बदनामी करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी त्यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे. अन्यथा आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तरी आ. नितेश राणेंनी या प्रकरणाचा पेनड्राईव्ह सीबीआयला देण्याची घोषणा विधानसभेत केली आहे.


मुलीची बदनामी आणि चारित्र्यहनन केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची तक्रार दिशाच्या आई-वडिलांनी पत्राद्वारे राष्ट्रपतींकडे केली आहे. या पाच पानी पत्रामध्ये त्यांनी राष्ट्रपतींना विनंती केली आहे. दिशाला न्याय मिळण्यासाठी संबंधित यंत्रणांना आदेश द्यावेत, अन्यथा आम्ही आमचे जीवन संपवू, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, दिशाच्या आई वासंती सॅलियान यांनी यापूर्वीही राजकीय नेत्यांना मुलीविषयी आक्षेपार्ह वक्तव्य न करण्याचे आवाहन केले आहे. मी माझ्या मुलीला गमावलं आहे. हे लोक आता आमची बदनामी करत आहेत. त्यांच्या राजकारणासाठी माझ्या मुलीच्या नावाचा वापर केला जात आहे. हे थांबायला हवं. आम्हाला शांततेत जगू द्या, अशी विनवणी वासंती सॅलियन यांनी केली होती.

आमदार नितेश राणे हे सातत्यांने दिशा सालियन प्रकरणावरुन महाविकास आघाडीविरोधात आरोप करत असून त्यांनी विधानसभेत पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित करत पुराने सीबीआयकडे देण्याची मागणी केली आहे.

नारायण राणे व नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशाच्या आईने याबाबत तक्रार दिली आहे. दिशाच्या पालकांनी आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर त्यावर राजकारण केल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली होती. राणे पिता-पुत्रांकडून या प्रकरणावर सातत्याने भाष्य केलं आहे. दिंडोशी न्यायालयाने त्यांना काही अर्टी-शर्तीसह नुकताच अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, मुंबईच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाकडे दिशाच्या मृत्यूनंतर तिच्या चारित्र्याची बदनामी करण्याची तक्रार केली होती. दिशाचे आई-वडीलांनीही महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. या प्रकरणावर राणेंकडून अप्रत्यक्षपणे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. त्यानंतर आता दिशाच्या आईवडिलांनी राष्ट्रपतींना पत्र लिहित मोठं पाऊल उचललं आहे.

Updated : 25 March 2022 9:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top