Home > News > दीपिकाने सगळे कपडे लॉंड्रीला टाकले का? रणबीरच्या फोशूटवर फणी मिम्स..

दीपिकाने सगळे कपडे लॉंड्रीला टाकले का? रणबीरच्या फोशूटवर फणी मिम्स..

दीपिकाने सगळे कपडे लॉंड्रीला टाकले का? रणबीरच्या फोशूटवर फणी मिम्स..
X

रणवीर सिंग सध्या त्याच्या एका फोटोशूटमुळे चर्चेत आहे. रणवीर सिंग याने नुकतेच एका मासिकाच्या मुखपृष्ठासाठी कपड्यांशिवाय (न्यूड) फोटोशूट केले आहे. फोटोशूट करण्‍याबाबत रणवीरने एका मुलाखतीत सांगितले की, हे करणे त्याच्यासाठी खूप सोपे आहे आणि मी हजारो लोकांसमोरही हे फोटोशूट करू शकतो. त्याचे हे फोटो समाजमाध्यमांवर आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे तर अनेकांनी त्याचे समर्थन केले आहे. इतकंच काय तर या फोटोवरून हजरो मिम्स देखील तयार केले आहेत..

रणवीरच्या फोटोशूटने समाजमाध्यमांवर धुमाकूळ

फोटोंमध्ये रणवीर कपड्यांशिवाय कार्पेटवर वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे. काही फोटोंमध्ये रणवीर झोपून पोझ देत आहे, तर काही फोटोंमध्ये तो उभा राहून पोज देताना दिसत आहे. अभिनेत्याची एक पोझ बर्ट रेनॉल्ड्ससारखी आहे. बर्ट रेनॉल्ड्सने देखील याच मॅगझिनसाठी फोटोशूटही केले होते.


फोटोशूटवर रणवीर काय म्हणाला?

रणवीरने मुलाखतीत सांगितले की, "शारीरिकरित्या नग्न राहणे माझ्यासाठी खूप सोपे आहे. मी माझ्या काही परफॉर्मन्समध्ये नग्न झालो आहे. तुम्हाला माझा आत्मा त्यामध्ये दिसेल. मी माझे सर्व कपडे हजारो लोकांपुढे काढू शकतो. याला माझी हरकत नाही, पण तिथल्या लोकांना थोडे अस्वस्थ होईल."

सोशल मीडियावर फनी मीम्स व्हायरल झाले आहेत...

या फोटोशूटसाठी सोशल मीडियावर लोक रणवीरची खिल्ली उडवत आहेत. एकाने "हे बघून दीपिका दीदी काय म्हणतील?" दुसर्‍याने लिहिले, "जेव्हा दीपिका सर्व कपडे लॉन्ड्रीला पाठवते." तर एका नेटकऱ्याने म्हंटले आहे की , "फक्त रणवीर सिंगच हे करू शकतो." असेच काही फनी मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.








Updated : 23 July 2022 8:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top