Home > News > धनंजय मुंडे यांचं भाऊ म्हणून पंकजा मुंडेंना आवाहन...

धनंजय मुंडे यांचं भाऊ म्हणून पंकजा मुंडेंना आवाहन...

धनंजय मुंडे यांचं भाऊ म्हणून पंकजा मुंडेंना आवाहन...
X

राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या धामधुमीत पंकजा मुंडे यांना सर्दी खोकला आणि ताप आल्याचं ट्विटर द्वारे सांगितलं होते. या ट्विटमध्ये पंकजा यांनी पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरिषजी बोराळकर यांना पहिल्या पसंदी चे मत देऊन विजयी करावे .. मला सर्दी खोकला व ताप आहे त्यामुळे मी जबाबदारी स्वीकारून isolate झाले आहे.. अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी.. असं आवाहन केलं होतं.

या ट्विटनंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटर द्वारे पंकजा यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे....


"पंकजाताई मी स्वतः करोना विषाणूचा त्रास सहन केला आहे, तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये. कोरनाविषयक सर्व चाचण्या करून घे. स्वतःची व घरच्यांची काळजी घे. तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे."

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राजकीय विरोधक असलेल्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये जवळीक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Updated : 2 Dec 2020 3:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top