Home > News > "देवेंद्रजी आणि अजित पवार You have done it !" अमृता फडणवीस यांचा व्हिडीओ व्हायरल

"देवेंद्रजी आणि अजित पवार You have done it !" अमृता फडणवीस यांचा व्हिडीओ व्हायरल

देवेंद्रजी आणि अजित पवार You have done it ! अमृता फडणवीस यांचा व्हिडीओ व्हायरल
X

महाराष्ट्र साखरझोपेत असताना महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. राजभवनात सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. या फसलेल्या शपथविधीला आज एक वर्ष पुर्ण झालं.

शपथविधी नंतर या दोघांनाही शुभेच्छा देणारा व्हिडीओ अमृता फडणवीस यांनी प्रसिध्द केला. आता हाच व्हिडीओ नेटकऱ्यांसाठी कंटेंट बनला आहे.

या व्हिडीओत अमृता यांनी "अभुतपुर्व असा हा क्षण आहे. स्थिर असं सरकार महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतंय. मला विश्वास आहे आता महाराष्ट्र प्रगतीच्या वाटेवरुन पुर्णपणे पुढे निघेल. यांनी महाराष्ट्राच्या प्रगतिसाठी काम करावं. अभिनंदन श्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार You have done it !" असं म्हटलं आहे.
Updated : 2 Sep 2021 10:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top