Home > News > दुसऱ्या महिला राष्ट्रपती मिळणार का?

दुसऱ्या महिला राष्ट्रपती मिळणार का?

दुसऱ्या महिला राष्ट्रपती मिळणार का?
X

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या सर्वाच्चपदी आदिवासी महीला राष्ट्रपती होणार का? याचा निकाल आज लागणार आहे. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू यांचा विजय होणार की विरोधकांचे संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा राष्ट्रपती पदी विराजमान होणार हे आज मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

देशाचे १६ वे राष्ट्रपती निवडण्यासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीमध्ये ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान पार पडले. राष्ट्रपती पदासाठी ७७१ खासदार आणि ४०२५ आमदारांसह ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला. त्यामुळे आज या निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे संपूर्ण `देशाचं लक्ष आहे.

मुर्मू विजयी झाल्यास त्या देशाच्या दुसऱ्या महिला आणि पहिल्या आदिवासी समाजाच्या नेत्या म्हणून २५ तारखेला सर्वोच्च पदावर विराजमान होतील. मूळच्या ओदिशाच्या असलेल्या मुर्मू या देशाच्या दुसऱ्या महिला तर आदिवासी समाजाच्या पहिल्या राष्ट्रपती होणार आहेत. प्रतिभाताई पाटील यांना पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला होता. आपल्या निवडीमुळे आदिवासी समाजाला आनंदच होईल, अशा प्रतिक्रिया द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली.

निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचा पाठिंबा असल्याने त्यांच्या विजयाची औपचारिकता उरली आहे. महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांकडून मुर्मू यांना ७० टक्क्यांहून अधिक मतं मिळतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळेच मुर्मू यांना किती मतं मिळतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा लाभला आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली तेव्हा भाजपकडे ५० टक्क्यांच्या आसपास मते होती. पण, आदिवासी समाजातील महिला उमेदवार म्हणून विविध राजकीय व प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा जाहीर केल्याने मुर्मू यांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळण्याची शक्यता आहे. मुर्मू यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबरच बिजू जनता दल, अण्णा द्रमुक, वायएसआर काँग्रेस, जनता दल धर्मनिरपेक्ष, अकाली दल, शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा, बसप, तेलुगू देसम या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. १० लाख, ८६ हजार, ४३१ एकूण मत मूल्यांपैकी मुर्मू यांना साडे सहा लाखांपेक्षा अधिक मतमूल्य मिळेल, असा विश्वास भाजपच्या गोटातून व्यक्त करण्यात आला होता.

विरोधी आघाडीतील झारखंड मुक्ती मोर्चा आणि शिवसेनेने आदिवासी समाजातील उमेदवार या मुद्द्यांवर भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. परिणामी यशवंत सिन्हा यांच्या मतांचे मूल्य कमी झालं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, समाजवादी पार्टी, द्रमुक, तेलंगण राष्ट्र समिती आदींनी सिन्हा यांना पाठिंबा जाहीर केला होता.

१० राज्यांमध्ये १०० टक्के मतदान

राष्ट्रपतीपदासाठी देशभरातील राज्यांच्या विधानसभांमध्येही मतदान पार पडले. छत्तीसगड, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम आणि तामिळनाडू या दहा राज्यांमध्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान झाले.

…म्हणून महाराष्ट्रात १०० टक्के मतदान नाही

महाराष्ट्रात विधानभवन येथे झालेल्या मतदान प्रक्रियेत २८७ पैकी २८३ आमदारांनी मतदान केले. आजारी असलेले भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप, शिवसेना आमदार महेंद्र दळवी, तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी मतदान केले नाही. राज्यात विधानसभेच्या २८८ जागा असल्या तरी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर एक जागा रिक्त झाल्याने सध्याचे संख्याबळ २८७ आहे.

राष्ट्रपतींची निवड कशी होते?

भारतात इलेक्टोरल कॉलेज प्रणालीद्वारे राष्ट्रपतींची निवड केली जाते. ज्यामध्ये खासदार आणि आमदार मतदान करतात. ही संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली होते. आता प्रश्न असा आहे की, इलेक्टोरल कॉलेज म्हणजे काय? त्यात वरच्या आणि खालच्या सभागृहातील निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश असतो. तसेच, त्यात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांच्या निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश होतो.

आकडेवारीनुसार, या निवडणुकीत 4 हजार 896 मतदार असतील. यामध्ये 543 लोकसभा आणि 233 राज्यसभा खासदार, सर्व राज्यांतील 4 हजार 120 आमदारांचा समावेश आहे.

एका मताची असते 'इतकी' किंमत -

खासदार आणि आमदारांनी टाकलेल्या मतांची किंमत एकापेक्षा जास्त असते. एकीकडे लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांच्या मतांचे मूल्य 708 आहे. त्याच वेळी, आमदाराच्या मताचे मूल्य राज्यांमधील लोकसंख्येच्या जनगणनेसारख्या गोष्टींवर अवलंबून असते. आमदाराच्या मताची गणना करण्यासाठी, राज्याच्या लोकसंख्येला विधानसभेतील आमदारांच्या संख्येने भागले जाते. हा निकाल पुढे 1000 हजारांनी भागला जातो. राज्यानुसार पाहिल्यास उत्तर प्रदेशातील एका आमदाराचे मत सर्वाधिक 208 आहे. तर अरुणाचल प्रदेशात हा आकडा 8 आहे.

याशिवाय राज्यसभा आणि लोकसभा खासदारांच्या मतांचे मूल्य 5 लाख 59 हजार 408 इतके आहे. तर आमदारांच्या बाबतीत ही संख्या 5 लाख 49 हजार 495 एवढी आहे. अशा स्थितीत इलेक्टोरल कॉलेजचा आकडा 10 लाख 98 हजार 903 वर पोहोचला आहे.

उमेदवाराचा विजय कसा होतो?

येथे उमेदवार केवळ बहुमताच्या जोरावर जिंकत नाही, तर त्याला विशिष्ट मतांचा कोटा मिळवावा लागतो. मतमोजणीच्या वेळी, आयोग सर्व निवडणूक महाविद्यालयांच्या वतीने कागदी मतपत्रिकेद्वारे टाकलेल्या सर्व वैध मतांची मोजणी करतो. उमेदवाराला एकूण पडलेल्या मतांपैकी 50 टक्के मते आणि एक अतिरिक्त मत मिळवावे लागते. सार्वत्रिक निवडणुकीत मतदार एका पक्षाच्या उमेदवाराला मतदान करतात. तर इलेक्टोरल कॉलेजमध्ये मतदार उमेदवारांची नावे बॅलेट पेपरवर पसंतीच्या क्रमाने लिहितात.

Updated : 21 July 2022 6:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top